Goa News: आवाजावर नियंत्रण नसेल तर पोलीस करणार कारवाई; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महतवाच्या घडामोडी
Goa News: आवाजावर नियंत्रण नसेल तर पोलीस करणार कारवाई; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

आवाजावर नियंत्रण नसेल तर पोलीस करणार कारवाई!

मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करत गोवा पोलिस सातत्याने याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. ऑक्टोबर 2024 पासून आतापर्यंत विविध आस्थापनांवर 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. 108 रुग्णवाहिकेचा एक इंचार्ज आणि दोन चालकांना निलंबित करण्यात आले आहे.

गोवा एनआयओच्या माजी शास्त्रज्ञांची दाबे सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाला भेट

राज्यातील ग्रामीण व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, ज्ञान मिळावे आणि भविष्यात नव्या शास्त्रज्ञांची निर्मिती व्हावी या उद्देशाने गोवा एनआयओच्या माजी शास्त्रज्ञांच्या 'Goodwill Efforts Team' सदस्यांनी दाबे, सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाला भेट दिली.

डिचोली गोवा-महाराष्ट्र सिमेवर बेकायदेशीर पक्क्या रस्त्याचे बांधकाम

गोवा-महाराष्ट्र सिमेवर डिचोली लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील लाडफे गावातून महाराष्ट्रातील आमडगांवपर्यंत बेकायदेशीर पक्क्या डांबरी रस्त्याचे बांधकाम. स्थानीक लाटंबार्से पंचायतीला काहीच कल्पना नाही. पंचायत मंडळाकडून रस्त्याची पहाणी. कठोर कारवाईची पंचायत मंडळाची मागणी.

मांद्रे अपघात; आरोपी दिपनच्या कोठडीत ४ दिवसांनी वाढ

जुनसवाडा मांद्रे येथे मेरी फर्नांडिस हिला वाहनाखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणी आरोपी दिपन राजू बत्रा याच्या कोठडीत वाढ. मांद्रे पोलिसांनी दिपन याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला होता.

पणजीत दुचाकीस्वारांकडून महिलेचा छळ; पुढील तपास चालू

रविवारी संध्याकाळी 10:30 च्या सुमारास पणजी येथील पट्टो ब्रिजजवळ एका दुचाकीस्वाराने महिलेचा छळ केला. उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी तपास सुरू केला आहे.

गोव्यात कार्निव्हलची तयारी अंतिम टप्यात

येत्या २८ फेब्रुवारीपासून राज्यात किंग मोमोचे राज्य सुरू होणार आहे, त्यासाठी गोवा सज्ज झाला आहे.

गोवा ते प्रयागराज 'बुलेट स्वार' सुखरूप गोव्यात परतले

गोवा ते प्रयागराज अन् अयोध्या, काठमांडू ते वाराणसी 'बुलेट'सवारी यशस्वी. नऊ दिवसांचा प्रवास करून डिचोलीतील दोन युवक रविवारी सायंकाळी सुखरूप परत.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुंबईच्या चालकाला म्हापसा येथे अटक

एका धक्कादायक घटनेत, गोवा पोलिसांनी पंतनगर, घाटकोपर (मुंबई) येथील रहिवासी अँथनी मारियन कार्डोज डायव्हरला अटक केली. त्याने म्हापसा येथे अनेक वाहनांना धडक दिली होती.

गोव्यातील मराठीवरील अन्याय दूर करा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव

'गोव्यातील नोकरभरती आयोगाच्या परिक्षेत कोंकणी भाषा अनिवार्य करुन सहभाषा मराठी भाषा टाळणे अन्यायकारक. ह्या एकांगी निर्णयामुळे गोव्याची सर्वांगीण हानी. केंद्र सरकारने मराठीवरील अन्याय दूर करावा'.दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव संमत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com