Goa Today's Live News: आणिबाणीला 50 वर्षे, भाजपा साजरा करणार 'काळा दिवस'

Goa Todays 24 June 2024 Live News: विवा सांजाव, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक निकाल, गुन्हे, राजकारण, क्रीडा, कला संस्कृती व पर्यटन विश्वातील ठळक बातम्या.
Goa BJP
Goa BJP

आणिबाणीला 50 वर्षे, भाजपा साजरा करणार 'काळा दिवस'

२५ जून १९७५ ला देशात कॉंग्रेस ने आणिबाणी जाहिर केली होती त्यामुळे हा दिवस भाजप 'काळा दिवस' म्हणून राज्यभर साजरा करणार आहे.

यावर्षी या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून युवा पिढी ला इतिहासाची ओळख करून देण्यासाठीच हे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती भाजप सरचिटणीस दामोदर नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी घेतली खासदारकीची शपथ!

संशयितासमवेत पोलिसांचे फोटो, पोलिसांच्या बिनशर्त माफीबाबत खंडपीठाकडून समाधान

गुन्ह्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितासमवेत पोलिसानी आपली छायाचित्रे प्रसिद्ध केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करून घेतलेली स्वेच्छा याचिका आज निकालात काढली.

सरकारने पोलिसांना याप्रकरणी दिलेली समज व संबंधित पोलिसानी मागितलेली बिनशर्त माफीबाबत खंडपीठाने समाधान व्यक्त करून सादर केलेला अहवाल स्वीकारत असल्याचे निरीक्षण केले आहे.

HC Bombay At Goa: मेरशीतील शेतजमिनीचे वसाहत मध्ये रूपांतर, न्यायालयाची स्थगिती

नगर व नियोजन कायद्याच्या कलम 17 (2) खाली मेरशी येथील सुमारे 6 हजार चौ.मी. शेतजमिनीचे वसाहत मध्ये रूपांतर करण्यासाठी टीसीपी खात्याने दिलेल्या परवानगीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी; मुख्यमंत्री सावंतांकडून मोदींना शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. विकसित भारत 2047 अंतर्गत गोवा विकसित करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले.

CM Pramod Sawant In Delhi: मुख्यमंत्री सावंतांनी घेतली केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (24 जून) दिल्लीत घेतली केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट. राज्यातील खाण वाहतूक, रेती उत्खननासह, किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात केली चर्चा.

Shripad Naik Takes Oath As MP: श्रीपाद नाईकांनी घेतली संस्कृतमधून शपथ

उत्तर गोव्यातून सहाव्यांदा निवडून आलेल्या श्रीपाद नाईकांनी लोकसभा सदस्यत्वाची घेतली संस्कृतमधून शपथ. नाईकांना मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

Bicholim Accident: डिचोलीच्या चौपदरी बगलमार्गावर म्हैस मृत्यूमुखी

डिचोलीच्या चौपदरी बगलमार्गाने घेतला गुराचा बळी. अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैस मृत्यूमुखी. पिराची कोंड परिसरात अपघात.

Usgao Accident: उसगाव येथे अपघातात एकाचा मृत्यू

उसगाव खुर्साकडे असलेल्या सर्व्हिस रस्त्याजवळील अपघातात संजय बाबलो पेडणेकर (52, गांजे, मुळ पेडणे ) याचा मृत्यू. फोंडा पोलीस घटनास्थळी दाखल. तपास सुरू.

Goa TCP कायद्यातील वादग्रस्त 17(2) कलमाला स्थगिती

उच्च न्यायालयाकडून नगरनियोजन कायद्यातील प्रादेशिक आराखडा 2021 मधील वादग्रस्त 17(2) कलमाला स्थगिती. ॲड. नायगेल कोस्टा फ्रियास यांच्याकडून युक्तिवाद. 17(2) अंतर्गत मुख्य नगर नियोजकाला प्रादेशिक आराखड्यात कोणत्याही सार्वजनिक सल्लामसलतीशिवाय बदल करण्याचा अधिकार होता.

Mapusa Police: म्हापसा पोलिसांकडून एकता नगरमध्ये गस्त

म्हापसा पोलिसांकडून रविवारी (22 जून) रात्री एकता नगरमध्ये गस्त. 115 भाडेकरूंची पडताळणी. COTPA अंतर्गत धुम्रपान उल्लंघनप्रकरणी 12 , सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानप्रकरणी 17 तर कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याप्रकरणी 11 जणांवर कारवाई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com