Goa News: फार्मा कंपनीच्या नोकरभरतीवरुन वाद, श्रेया - नमिताला जामीन; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 22 May 2024 Breaking News: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या क्रीडा, कला, संस्कृती, गुन्हे, राजकारण यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
Mapusa Fire Dept
Mapusa Fire DeptDainik Gomantak

अखेर त्या फार्मा कंपनीकडून वादग्रस्त नोकरभरती मुलाखत रद्द

इनडोको रेमेडीस या फार्मा कंपनीत विविध पदाच्या नोकरभरतीच्या जागा भरण्यासाठी भोईसर महाराष्ट्र येथे मुलाखत आयोजित करण्यात आल्या होत्या. यावरुन विरोधकांनी रान उठवल्यानंतर अखेर ही मुलाखत रद्द करण्यात आली आहे.

ॲलिस्टर पुलिकल हल्ला प्रकरण; फरार आरोपीला अटक

ॲलिस्टर पुलिकलवर हल्ला करून दहा ते बारा दिवसांपासून फरार असलेला आरोपी थॉमस फर्नांडिस (32) याला कोलवाळ पोलिसांकडून अटक.

रेहबर खान खून प्रकरण; एकास जामीन

Rehbar Khan Murder Case

पर्वरी येथील रेहबर खान हत्याकांडातील 10 आरोपींपैकी संदेश नाईकला म्हापसा येथील सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. लव्ह ट्रँगलच्या वादातून रेहबरचा खून झाला होता.

कोलवाळ येथे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Mapusa Fire Dept

कोलवाळ येथील दत्त मंदिराजवळील अपार्टमेंटमध्ये शर्मिला गावडे (43) यांचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. म्हापसा अग्निशमन दल आणि कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल. अधिक तपास सुरू.

Mapusa Fire Dept
Mapusa Fire DeptDainik Gomantak

श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला सशर्त जामीन मंजूर

श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्फेकरला केपे प्रथम श्रेणी न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर. कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात महिनाभर हजेरी लावण्यासहीत फातर्फेत प्रवेश बंदी.

गोव्यात तीन दिवस येलो अलर्ट

Yellow Alert In Goa

गोव्यात आज व पुढील दोन दिवस (२२, २३ आणि २४ मे) विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी.

Yellow Alert In Goa
Yellow Alert In Goa

गिरीत जलवाहिनीच्या एअरव्हॉल्वची दुरूस्ती, हाजारो लीटर पाण्याची नासाडी

Water Pipeline Busted

गिरी येथील ग्रीन पार्क जंक्शनवरील कळंगुट व पर्वरी मतदारसंघाला पाणीपुरवठा करणारी मुख्य 1000 एमएम जलवाहिचा एअरव्हॉल्व दुरूस्तीसाठी काढल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी.

Water Pipeline Busted
Water Pipeline BustedDainik Gomantak

आम आदमी दिल्ली आणि महिला विरोधी पक्ष - मुख्यमंत्री डॉ. सावंत

CM Pramod Sawant In Delhi

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत, आम आदमी दिल्ली आणि महिला विरोधी पक्ष असल्याचा आरोप केला.

मांडवी एक्सप्रेस 12 दिवस दीड तास उशिराने धावणार

Mandovi Express

मुंबई येथील सीएसएसटी जंक्शनवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे मांडवी एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 10104) मडगाव जंक्शनवरून 22 मे ते 2 जून या कालावधीत दीड तास (09:15 ऐवजी 10:30 वाजता) उशिराने सुटणार.

गोव्यातील फार्मा कंपनीसाठी मुंबईत मुलाखती, सरदेसाईंचा आक्षेप

गोव्यात असलेल्या इनडोको रेमेडीस या फार्मा कंपनीत विविध पदाच्या नोकरभरतीच्या जागा भरण्यासाठी भोईसर महाराष्ट्र येथे मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून गोमंतकियांना रोजगारापासून डावलण्याचा हा प्रकार आहे.

हा प्रकार अनेकदा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी गोमंतकियांनाच गोव्यातील कंपन्यांमध्ये रोजगार दिला जाईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून या कंपनीला जाब विचारून गोमंतकियांना रोजगार मिळवून देण्यासाठी गोव्यात मुलाखती घेण्याची सक्ती करावी, अशी मागणी व फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

मडगाव येथे 33 हजार रुपयांचे अवैध मद्यसाठा जप्त, कर्नाटकच्या एकाला अटक

Margao Railway Station

मडगाव स्थानकावर 33 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. कोकण रेल्वेने ही कारवाई केली असून, कर्नाटकच्या एकाला अटक केलीय.

Margao Railway Station
Margao Railway StationDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com