Goa Today's News: धबधब्यांवरील बंदीचा विषय पोहोचला मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!

Goa Today's 17 June 2024 Live News: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा, संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

धबधब्यांवरील बंदीचा विषय पोहोचला मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!

वन खात्याकडून धबधब्यांवर जाण्यास घातलेल्या बंदीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला. पर्यटनमंत्री खंवटेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आता मुख्यमंत्री काय तोडगा काढणार याकडे वर्षा पर्यटन प्रेमींचे लक्ष आहे.

CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Govind Gaude: मंत्री गावडे राजिनामा द्या! कलाकारांची मागणी

कला अकादमीच्या कथीत दुरुस्ती घोटाळ्यावरून मंत्री गावडेंवर कलाकारांची सडकून टीका. मंत्री गावडेंच्या राजिनाम्याची तीव्र मागणी.

Calangute Crime News: कळंगुट येथे पर्यटकाचे बॅग घेऊन पळणारे तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

कळंगुट येथे पर्यटकाचे बॅग घेऊन पळणारे तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात. तीन मोबाईल फोन जप्त.

Yellow Alert In Goa:गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

गोव्यात आजपासून (दि. १७ जून) ते २१ जूनपर्यंत (पाच दिवस) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आमदार डॉ. गणेश गांवकर यांना मंत्रीपद देण्याची मागणी!

सावर्डे मतदारसंघातील सातही पंचायतच्या सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट घेतली. त्यांनी यावेळी आमदार डॉ. गणेश गांवकर यांना मंत्रीपद देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

Tree Fallen In Margao: आके-मडगाव येथे झाड कोसळून दोन कारचे नुकसान

आके-मडगाव येथे झाड कोसळून दोन कारचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत झाड्याच्या फांद्या बाजुला केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com