Goa Today's News: भाऊ, तुकाराम विरोधात तक्रार, मंगळवारी गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी मतदान; राज्यातील ठळक बातम्या

Goa Today's 06 May 2024 Marathi Breaking News: लोकसभा तिसऱ्या टप्प्यातील मतदान, राजकारण, गुन्हे, क्रीडा, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
North Goa Lok Sabha Constituency | shripad naik
North Goa Lok Sabha Constituency | shripad naik

भाजप आणि श्रीपाद नाईक यांच्याविरोधात तक्रार

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या वतीने भाजप आणि श्रीपाद नाईक यांच्या विरोधात उत्तर गोवा आरओ विरोधाक तक्रार दाखल केली आहे. पक्षाचे चिन्ह, नाव असलेले व्होटर स्लिपचे वाटप केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय.

बोरी पूल १२ मे रोजी बंद राहणार

Boriem Bridge Closed

पूलाची आणि डेक उंची तपासणीच्या कामानिमित्त येत्या १२ मे रोजी सकाळी सहा ते आठ (दोन तास) या बोरी पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.

गोव्यातून कोल्हापुरात वाहतूक केले जाणार सहा लाखांचे मद्य आंबोलीत जप्त

Goa Made Liquor Seized

गोव्यातून कोल्हापूर येथे वाहतूक केले जाणार सहा लाख ११ हजार रुपयांचे मद्य आंबोलीत जप्त. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ

सांगे वितरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना सकाळी 9.30 वाजता यायला सांगितले होते. मात्र, केंद्रावर सुविधांची वाणवा दिसून आली, पाणी पिण्यासाठी ग्लास नव्हते.

जेवणाची रांगेत उभे राहिलेल्या केवळ पहिल्या वीस लोकांनाच जेवण मिळाले. उरलेल्या लोकांना दाळ भातावर समाधान मानावे लागले. दरम्यान, ते देखील अर्ध्या तासांत संपले.

Goa Loksabha 2024
Goa Loksabha 2024Dainik Gomantak

मतदानास उरले काही तास, पोलिसांकडून तपासणी नाक्यावर चौकशी

दोन लोकसभा जागांसाठी गोव्यात मंगळवारी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलिसांकडून जिल्हातील सर्व तपासणी नाक्यावर संशयित वाहनांची कसून चौकशी केली.

पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जुआन यांची तडीपार आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव

पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्कारेन्हस यांची तडीपार आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव. सडये - शिवोली येथील पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जुआन यांच्या विरोधात तडीपार आदेशाला स्थगिती देण्यास राज्याच्या सचिव आणि संबधित प्राधिकरणाने नकार दिला होता.

सांताक्रूझ सरपंच, उपसरपंच यांच्याविरोधात अविश्वास ठराव

No Confidence Motion St. Cruz Panachayat

सांताक्रूझ पंचायतीचे सरपंच जेनेफर डी ओलीवेरा आणि उपसरपंच इलसन ब्रागांझा यांच्याविरोधात सहा पंच सदस्यांकडून अविश्वास ठराव.

प्रभाग क्रमांक 3 चे अपक्ष उमेदवार इनासिओ परेरा यांनी काढला सत्ताधारी पॅनेलचा पाठिंबा.

कार्मुली येथे घराला आग, एक लाखांचे नुकसान

Camurlim Mapusa Fire Case

कार्मुली येथे चोडणकर यांच्या घराला आग, आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पाच लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले आहे. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Camurlim Mapusa Fire Case
Camurlim Mapusa Fire Case Dainik Gomantak
Camurlim Mapusa Fire Case
Camurlim Mapusa Fire Case Camurlim Mapusa Fire Case

मतदानापूर्वी आरजीला झटका; मनोज परब यांच्याविरोधात गुन्हा

FIR Against Manoj Parab

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार मनोज परब यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फोंडा पोलिसांकडून विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com