Goa Todays' News: पेडणे पोलिसांचा छापा, 86,000 हजाराच्या ड्रग्जसह एकाला अटक

Goa Today's 03 June 2024 Live News Update: लोकसभा निकालाची उत्सुकता, गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
Arrested
ArrestedDainik Gomantak

पेडणे पोलिसांचा छापा, 86,000 हजाराच्या ड्रग्जसह एकाला अटक

पेडणे पोलिसांनी केलेल्या छापेमारीत ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली. एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(बी)(आय)(ए) आणि 22(अ) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव आकाश राजेश संचेती आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आकाशकडून तब्बल 86,000 हजाराचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.

Arrested
ArrestedDainik Gomantak

वझरीवासीयांसमोर सरकारची नांगी

Pernem News

पेडणे तालुक्यातील वझरी गावात स्वयंघोषितपणे आपल्या मालकीचा दावा करणाऱ्या एका महिलेकडून सर्वेक्षण विभागातर्फे जमीन मोजणीचा घातलेला घाट आज वझरीवासीयांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. 06 जून रोजी जमीन मोजणी करण्यात येणार होती.

वझरी शेतकरी कृती समितीच्या पहिल्या लढ्याला यश मिळाले असले, तरी ग्रामस्थांनी जागृत राहावे, असे समितीचे अध्यक्ष नीलेश शेट्ये यांनी सांगितले. याप्रकरणी तीव्र विरोध करण्यासाठी काल रविवारी शेतकरी नागरिक समितीतर्फे श्री सातेरी मंदिरात बैठक घेण्यात आली.

त्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 06 जून रोजीच्या भोम भरडी येथे संपूर्ण गाव विरोधासाठी एकत्र येण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत सरकार दरबारीसुद्धा सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली होती. 06 रोजी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे ही मोजणीच रद्द करण्यात आली आहे.

गोव्यात उद्यापासून सुरु होणार शाळा, दक्षिण गोव्यात काही शाळा बंद राहणार

गोव्यात उद्यापासून शाळा सुरु होणार आहेत, दरम्यान लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील काही शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. शाळेत येण्यासाठी मुले उत्सुक असल्याचे शैलेश झिंगडे यांनी म्हटले आहे.

कळंगुट येथील 'तो' क्लब सील

गुजरातच्या पर्यटकाची फसवणूक केल्याप्रकरणी वादात सापडलेला कळंगुट येथील क्लब सील. याप्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आलीय. क्लब मालकांविरोधात देखील कारवाई सुरू. यापूर्वीही अशा आस्थापनांविरुद्ध कारवाई.

बीचवरील शॅक्सना मुदतवाढ

Beach Shacks

गोवा पर्यटन खात्याने समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सना मुदतवाढ दिली आहे. सध्याचे हवामान विचाराता घेता पर्यटकांना आणखी काहीकाळ शॅक्सचा आनंद घेता यावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

बाणावलीत इंडिया आघाडीतर्फे आपचा उमेदवार

Benaulim ZP Election

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीतर्फे आपचा उमेदवार असणार रिंगणात. 23 जून रोजी होणार पोटनिवडणूक.

दोन्ही जागा भारतीय जनता पक्षच जिंकणार - सदानंद शेट तानावडे

Goa Loksabha Result

लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष नक्कीच जिंकणार. आता फक्त औपचारिकता राहिली आहे.

2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी सुध्दा विरोधकांनी महाआघाडी केली केली तरी त्याचा कसालच फरक भाजपाला पडणार नसल्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

उत्तर गोवा पोलिसांच्या वतीने भव्य भाडेकरु तपासणी मोहीम

North Goa Tenant Verification Drive

उत्तर गोवा पोलिसांनी भव्य भाडेकरु तपासणी मोहीम राबत एक दिवसात सुमारे तीन हजार लोकांची तपासणी केली. तर, त्याच रात्री हा आकडा पाच हजारपर्यंत गेला.

यातून सुमारे पाचशे लोकांकडे भाडेकरु करार नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबधितांना कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.

North Goa Tenant Verification Drive
North Goa Tenant Verification DriveDainik Gomantak

म्हापसा मामलेदार परिसरात चार दुकानांत चोरी

Theft In Mapusa

म्हापसा मामलेदार परिसरातील चार दुकानांत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फोंड्यात दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागून कर्मचारी जखमी

वीज खांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागून सिद्धेश आनंद नाईक (32, बांदोडा) जखमी. फोंड्यातील सपना पार्कजवळ घडली घटना. उपचारासाठी गोमेकॉत दाखल.

Ponda
Ponda Dainik Gomantak
Arrested
Goa Loksabha Result 2024: एक्झिट पोलनंतर विरोधकांची मदार ‘सायलेंट’ मतदारांवर; निकाल उद्या

पर्यटक पोलिस कोलवा समुद्रकिनारी तीन ऑलिव्ह रिडले कासवांना जीवदान

Colva Police Olive Ridley

पर्यटक पोलिस आणि जीवरक्षकांडून कोलवा समुद्रकिनारी तीन ऑलिव्ह रिडले कासवांना जीवदान. कासवांना केले वन खात्याकडे सुपूर्द.

'त्या' दोन दलालांना कळंगुट येथून अटक

Calangute Crime

मुलगी देण्याचे आमीष दाखवून गुजरातल्या पर्यटकाला लुटल्याप्रकरणी दोन्ही दलालांना कळंगुट पोलिसांनी केली अटक. दोघांविरुद्ध 386/420 कलमाखाला नोंदवला गुन्हा. पुढील तपास सुरू. गोमन्तक टिव्हीने प्रसिद्ध केलेल्या बातमीसाठी पर्यटकाने मानले आभार.

Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com