कळंगुटमध्ये 64 वर्षीय 'त्या' महिलेचा खूनच, गुन्हा दाखल; गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today Breaking Update: गोव्यात गुन्हे, राजकारण, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.
कळंगुटमध्ये 64 वर्षीय 'त्या' महिलेचा खूनच, गुन्हा दाखल; गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुटमध्ये 64 वर्षीय 'त्या' महिलेचा खूनच, गुन्हा दाखल

नायकवाडा, कळंगुट येथे संशयास्पद पद्धतीने आढलेल्या दिओदिता फर्नांडिस (64) यांचा खूनच. गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक अहवालातून उघड. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर खूनाचा कळंगुट पोलिसांकडून गुन्हाचा गुन्हा नोंद.

कार्यालय हे आमच्यासाठी आमचं घर - फडणवीस


आज गोवा प्रदेश कार्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीची पायाभरणी संपन्न झाली याचा खूप आनंद. आमचं कार्यालय हे आमच्यासाठी आमचं घर असतं. मी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण गोव्याच्या टीमचे अभिनंदन करतो. पायाभरणी समारंभानंतर देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य.

मुसळधार पावसाचा फटका, मुंगूल पुलाची संरक्षक भिंत कोसळली

मडगाव- कोलवा मार्गावरील मुंगूल पुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. मुसळधार पावसामुळे भिंत खचल्याचा अंदाज. प्रशासन मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील.

Devendra Fadanvis In Goa: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोव्यात आगमण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोव्यात आगमण झाले आहे. राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले स्वागत.

8 लाखांचा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नागवा येथे दोघांना अटक

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संजीब मारंडी (26) आणि दीपिका पलाई (18) यांना हणजूण पोलिसांकडून अटक. 8.17 लाख किंमतीचा 8.175 किलोग्रॅम अमली पदार्थ गांजा जप्त. चापेल, डायसवाडो, नागवा बार्देश येथे कारवाई.

पार्किंग वाद! गुंड शैलेश गरडला अटक

दिल्लीतील नेमबाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना दिव्यांग म्हणून शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सराईत गुंड शैलेश गरड आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद. शैलेश गरडला अटक. पार्किंगच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळला होता.

पाऊस पुन्हा सक्रीय होताच राज्यातील नद्या तुडूंब!

सुरवातीला दिलेल्या तडाख्यानंतर गेले काही दिवस गायब झालेल्या पाऊस पुन्हा सक्रीय होताच राज्यातील महत्वाच्या नद्या पुन्हा तुडूंब. रगाडा, म्हादई आणि वाळवंटी नदी पात्राची ही दृष्ये.

खाणखंदकातून पाणी बाहेर सोडू नका, डिचोलीतील व्यापारीवर्गाची मागणी

खाणखंदकातून पाणी बाहेर सोडू नका. पावसाचा जोर वाढल्याने डिचोलीतील व्यापारीवर्गाची मागणी. व्यापारी भयभीत. पावसाच्या जोरावेळी खाणखंदकातून पाणी सोडल्याने गेल्या जुलै महिन्यात दोनवेळा शहराला दिला होता पुराने वेढा.

Goa Monsoon: पावसाच्या दमदार "रि एन्ट्री"ने साखळीत पूरस्थिती

काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाची राज्यात धडाकेबाज "रि एन्ट्री". काही तासांच्या मुसळधार पावसामुळे साखळीतील वाळवंटी नदी परिसरात पूरस्थिती. बाजारातील नाल्यात साचले पाणी. पाणी पंपींग करून बाहेर काढण्याचे काम सुरु.

बोगदा, मुरगाव येथे भूस्खलन; मार्ग बंद, वाहतूक विस्कळीत

बोगदा, मुरगाव येथे भूस्खलन झाले असून, मार्ग बंद झाला आहे. यामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Firing In Goa: पार्किंगवरून वाद! म्हापशात नेमबाजांचा हवेत गोळीबार

पार्किंगवरून शैलेश गरड (हिस्टरी शीटर) याने यश शूटिंग अकॅडमीमध्ये नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडूंसोबत वाद उकरून काढला व बाचाबाचीस केली सुरुवात. यावेळी गाडीमधील खेळाडू घाबरले असता, त्यांच्या कोचने स्वसंरक्षणासाठी स्पोर्ट्स गनचा वापर केला.

ज्याने फक्त गोळीबार केल्याचा आवाज येतो. यावेळी कुठल्याही शस्त्राचा वापर किंवा प्रत्यक्ष गोळीबार झालेला नाही असे पोलिसांकडून स्पष्ट. पुढील तपास म्हापसा पोलीस करताहेत.

खांडेपार पुलाजवळ अपघात, दुचाकीचालक जखमी

पार उसगाव येथे खांडेपार पुलाजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक. MRF कंपनीचा कर्मचारी बसवराज पाटील हा दुचकीस्वार जखमी. कंपनीच्या रुग्णवाहिकेतून बसवराज तिस्क उसगाव येथील पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल. शनिवारी सकाळी कामावर जात असताना घडला अपघात.

MP Viriato Fernandes: खासदार विरियातोंनी जाणून घेतल्या दूधसागर जिप असोसिएशनच्या समस्या

दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडीस यांची कुळे गावाला भेट. दूधसागर जिप असोसिएशनच्या समस्या घेतल्या जाणून.

Goa Monsoon: साखळीला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

साखळी शहराबरोबरच परिसराला पावसाने सकाळपासून अक्षरशः झोडपून काढले. सर्वत्र जलमय स्थिती झाली असून काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत आहे. वाळवंटी नदीच्या पाणी पातळीतही वाढ .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com