Goa News: गोवा राज्य शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अध्यक्षपदी उपेंद्र गावकर नियुक्त

Goa Today's Live News In Marathi: गोव्यातील राजकारण, गुन्हे, अपघात, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa live news
Goa live newsDainik Gomantak

आठ वर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याचा चावा; फोंड्यात घटनांची वाढ

फोंड्यात कुत्र्याकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जयसीनगर येथे आठ वर्षीय मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. स्थानिकांनी याप्रकरणी संताप व्यक्त करत, वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गोमेकॉत सुरक्षा रक्षकाची गुंडगिरी; रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण, आगशी पोलिसांकडून अटक

गोमेकॉत सुरक्षा रक्षकाने रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन भागू येडगे (२७, साकोर्डा, धारबांदोडा) याला अटक करण्यात आली आहे. १९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली

ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा दरम्यानची डावी बाजू पाच महिने बंद राहणार

राष्ट्रीय महामार्गावरील ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा दरम्यानची डावी बाजू पाच महिने बंद राहणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या वतीने आदेश जारी करण्यात आला आहे. एलिवेटेड कॉरिडोअरच्या कामानिमित्ताने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. २४ ऑगस्ट २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या काळात हा मार्ग बंद राहणार आहे.

Goa live news
Goa Accident: चालकाचे नियंत्रण सुटले, स्टँड तोडून अष्टमीच्या फेरीत घुसली प्रवासी बस, चार जखमी; मोठी दुर्घटना टळली Video

नव्याने नियुक्त झालेल्या मंत्र्यांसाठी सोमवारी खातेवाटप होणार : दामू

अमावास्या असल्याने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी खातेवाटप न करण्याची विनंती नवनिर्वाचित मंत्र्यांनी केली. आता दांबाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी खातेवाटप केले जाईल : दामू नाईक, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष

ईडीसी जमीन घोटाळ्याबाबत उत्तर गोवा सत्र न्यायालयाचे निर्देश उच्च न्यायालयाने केले रद्द

पाट्टो येथील ईडीसी येथील ३०० कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी एसीबी आणि सीबीआयला एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देणारा उत्तर गोवा सत्र न्यायालयाचा आदेश गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे आणि तो रद्द केला आहे. प्राथमिक चौकशी व्हायला हवी होती असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा विचारार्थ पाठवले आहे. २२ ऑगस्ट २०२५ रोजीचा हा निर्णय सार्वजनिक जमीन वाटपाच्या सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत एक महत्त्वपूर्ण घडामोडी दर्शवितो.

आप अध्यक्ष अमित पालेकर यांनी रस्त्यांची स्थिती दाखवण्यासाठी केले सायकल राईडचे आयोजन

आप अध्यक्ष अमित पालेकर यांनी रस्त्यांची स्थिती दाखवण्यासाठी सायकल राईडचे आयोजन केले. सर्व ४० आमदारांना त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. पर्वरीमधील खाप्रेश्वर देवस्थान येथून सायकल राईड सुरू झाली ज्यामध्ये आप आमदार वेंझी व्हिएगास, इतर आप नेते आणि सदस्य सहभागी झाले होते.

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केली मोठी घोषणा

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आगामी काळात भारत अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवणार आहे.

साकवार- बोरी येथे पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

साकवार- बोरी येथे पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक. कार मधील सर्वजण सुखरूप. मडगांव - फोंडा मार्गांवरील वाहतुक कोंडी

साखळीत श्री देवी महालक्ष्मीची जायांची पूजा उत्साहात...

गणेशोत्सवाच्या प्रवासासाठी पुरेशी व्यवस्था करण्यासाठी केटीसी सज्ज

गणेशोत्सवादरम्यान जवळच्या राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केटीसी पुरेशी व्यवस्था करेल. गेल्या वर्षीही आम्ही व्यवस्था केली होती आणि यावर्षीही आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. सध्या, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागांमध्ये आंतरराज्य मार्गांवर सुमारे ७२ बस धावत आहेत: उल्हास तुएनकर, केटीसीएल अध्यक्ष

गव्यांची दहशत! मये तलावाजवळ गव्याची कारगाडीला धडक

गव्यांची दहशत. शुक्रवारी रात्री मये तलावाजवळ गव्याची कारगाडीला धडक. कारगाडीच्या दर्शनी भागाची मोडतोड. कारचालक युवक सुखरूप

आमदार जीत आरोलकर यांनी गणेश चतुर्थी निमित्त आगरवाडा येथे कडधान्याचे वाटप केले

यावेळी बोलताना ते म्हणाले श्री गणेश चतुर्थी आमचा सर्वात मोठा सण मात्र महागाईच्या काळात हा सण उत्साहात साजरा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणूनच उदर्गत संस्था गेल्या काही वर्षापासून मांद्रे मतदार संघामध्ये कडधान्यांचे वाटप करते

गोवा राज्य शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अध्यक्षपदी उपेंद्र गावकर नियुक्त

गजानन किर्तीकर संपर्क नेते, डॉ. श्रीकांत शिंदे सल्लागार, सुभाष कांता सावंत संपर्क प्रमुख, काशिनाथ मयेकर सचिव, सुनिल सांतिनेजकर उत्तर गोवा प्रमुख व गणबा देसाई दक्षिण गोवा प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com