Goa Accident: चालकाचे नियंत्रण सुटले, स्टँड तोडून अष्टमीच्या फेरीत घुसली प्रवासी बस, चार जखमी; मोठी दुर्घटना टळली Video

Panjim Bus Accident: बस आष्टमीच्या फेरीत घुसल्याने फेरीतील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चारजण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
Passenger bus loses control Goa
Goa bus accident news | Ashtami fair accident GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा पणजी मार्केटजवळ अपघात झाला. मासळी मार्केटच्या विरुद्ध दिशेला असलेल्या स्मार्ट सिटीच्या बस स्थानकावर बस आदळून स्थानक तुटले आहे. तसेच, बस आष्टमीच्या निमित्ताने लागलेल्या फेरीत घुसल्याने चारजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास एक प्रवासी बस पणजी मार्केटच्या विरुद्ध दिशेला असलेल्या स्मार्ट सिटीच्या बस स्थानकाला येऊन धडकली. बस एवढ्या वेगात होती की धडकेत बस स्थानक मोडून पडले आहे. तसेच, बस आष्टमीच्या फेरीत घुसल्याने फेरीतील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चारजण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Passenger bus loses control Goa
Goa Politics: दिगंबर कामतांच्या मंत्रिपदाचा भाजपला किती फायदा?

जखमींमध्ये तीन पुरुष आणि एक महिला असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिस आणि पणजी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बस बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी क्रेन दाखल झाली असून, बस बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, बस स्थानक आणि सिंमेटच्या पोलला धडकून बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com