कलाकार राजदीप नाईक यांना नोटीस म्हणजे बदला, कला राखण मांड; गोव्यातील ठळक बातम्या
Kala Rakhan MandDainik Gomantak

कलाकार राजदीप नाईक यांना नोटीस म्हणजे बदला, कला राखण मांड; गोव्यातील ठळक बातम्या

Goa's Today News Live Update: राजकारण, गुन्हे, कला क्रीडा संस्कृती यासह गोव्यात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.
Published on

आयआयटी कुठे न्यायची हे सरकारच्या हातात!

आयआयटीसाठी जागा सुचवण माझं काम. ते मी केलं. आता पुढचा निर्णय सरकारचा.जर सरकारला अन्य कुठे स्वस्तात वा सरकारी जागा मिळत असेल तर सरकार त्याचाही विचार करू शकतो. काणकोणात आयआयटीला स्वागत करण्याच्या सभापती तवडकरांच्या भुमिकेवर मंत्री फळदेसाईंची प्रतिक्रिया.

GST Council तिसरी बैठक, मुख्यमंत्री सावंतांच्या अध्यक्षेत पार पडली बैठक

कलाकार राजदीप नाईक यांना नोटीस म्हणजे बदला; कला राखण मांड

कला राखण मांड ग्रुपकडून कला अकादमीच्या नवीन धोरणाबद्दल चिंता व्यक्त. गोव्यातील कलाकारांची छळवणूक होत असल्याचा मांड सदस्यांकडून आरोप. अकादमीने कलाकार राजदीप नाईक यांना अकादमीतील समस्या सांगितल्याबद्दल बेकायदेशीर नोटीस बजावली. ही कारवाई म्हणजे बदला.

मांडवी पूलावरील अपघात! वरिष्ठ अधिकारी करणार प्रकरणाचा तपास

मांडवी पूलावर झालेल्या अपघाताचा वरिष्ठ अधिकारी तपास करणार आहेत. या अपघातात एक मजूर ठार झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. पोलिस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात लवकर चार्चशीट दाखल करण्याची सूचना करण्यात आलीय.

विनापरवाना होर्डिंग्जवर कारवाई न केल्यास पंचायतीवर होणार कारवाई

विनापरवाना उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जप्रकरणी राज्यातील सर्व पंचायतीना परिपत्रक जारी केले जाणार. पंचायतीने होर्डिंग्जवर कारवाई न केल्यास पंचायत राज कायद्यांतर्गत पंचायतीवर होणार कारवाई. बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी राज्य सरकार कायदा करणार, सरकारची कोर्टात माहिती. अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांची माहिती.

आनंद वार्ता! मूर्तीकारांच्या अनुदानात वाढ

गोवा सरकारने मूर्तीकारांसाठीचे अनुदान 100 रुपयांवरुन केले 200 रुपये. जास्तीत जास्त 250 मूर्त्यांपर्यंत मिळणार अनुदान. GHRSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक अजय गावडेंची माहिती. मूर्त्या स्वता बनविल्याचे हमीपत्र सादर करण्याची अट. अनुदान फक्त गोव्यातील मूर्तींकारांना लागू असेल.

गोव्यातील कलाकारांसाठी आनंदाची बातमी, सरकारकडून 'कला वृद्धी' पुरस्काराची घोषणा

यंदापासून कला आणि संस्कृती खात्याकडून नव्या 'कला वृद्धी' पुरस्काराची मंत्री गोविंद गावडेंची घोषणा. 25 हजार रोख, शाल श्रीफळ आणि मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरुप. युवा सृजन पुरस्कार प्राप्त कलाकार ह्या पुरस्काराचे मानकरी ठरु शकत नाहीत. यंदाच्या कला गौरव, कला वृद्धी व इतर पुरस्कारांसाठीचे अर्ज रविंद्र भवन व कला मंदीरात उपलब्ध असणार.

Goa Crime News: अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ओडिशामधील तरुणाला अटक

गांजाची तस्करी करणाऱ्या ओडिशामधील तरुणाला म्हापसा पोलिसांकडून अटक. अजया नायक (30) असे संशयिताने नाव असून त्याच्याकडे 850 ग्रॅम गांजा सापडला. मंगळवारी रात्री उशिरा एका कॉलेज जवळ कारवाई.

उडीवाडा-उसगाव येथे वीज कोसळून तिघेजण जखमी, घरांचे नुकसान

काल झालेल्या मोठ्या गडगडाटसह उडीवाडा-उसगाव येथे वीज कोसळून साईश तिळवे, वाली अक्षिता तिळवे व अश्विका नाईक जखमी. नाईक व तिळवे यांच्या दोन्ही घरांचे नुकसान. वीज पुरवठा यंत्रणा जळून खाक. बुधवारी संध्याकाळची घटना.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com