गोवा सरकार लवकरच गोवंश कत्तलीसाठीची वाहतूक बंदी उठवणार आहे. प्राण्यांमध्ये पसरलेल्या लम्पी संसर्ग रोगामुळे मागील काही महिन्यापूर्वी सरकारने शेजारील राज्यामधून प्राण्यांच्या वाहतूकीवर बंदी घातली होती. दरम्यान, लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग कमी झाल्याने गोवा सरकार वाहतूक बंदी उठवण्याच्या तयारीत आहे.
(Goa To Lift Ban on Cattle Transportation For Slaughtering)
गोवा मीट व्यापारी असोसिएशनने गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये कत्तलीसाठी गुरांच्या वाहतुकीवरील बंदी उठवण्याचे आवाहन राज्य सरकारला केले होते.
"लम्पी त्वचा संसर्ग आजारामुळे प्राण्यांच्या वाहतूकीवर बंदी घालण्यात आली होती. परिस्थिती असल्याने, आम्ही लवकरच बंदी उठवण्याचा निर्णय घेणार आहे," अशी माहिती गोव्याचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून कत्तलीसाठी येणाऱ्या जनावरांच्या वाहतूकीवर सप्टेंबर 2022 मध्ये बंदी घातली होती. दोन्ही जिल्हात वाहतूकीवर बंदी होती. मीट व्यापारी असोसिएशनच्या मते गोव्यात दररोज वीस टन मांसाची गरज असते. या मांसाची गरज भागवण्यासाठी शेजारील राज्यांमधून जनावरांची वाहतूक केली जाते. राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने मांसाची वाढती मागणी लक्षात घेता, वाहतूकबंदी उठवण्याची मागणी असोसिएशन केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.