Goa Namo Van Scheme: गोव्यातील नगरपालिकांमध्ये बहरणार 'हरित क्षेत्रे'! 'नमो वन' योजनेअंतर्गत केंद्राकडून गोव्याला 6 कोटींचे मोठे अर्थसाहाय्य

Goa Urban Green Spaces: ‘नमो वन योजने’अंतर्गत सोनसोडो येथील जुन्या कचरा डेपोचे हरित क्षेत्रात रूपांतर करण्यास राज्य सरकारला यश मिळालेले होते.
Goa Urban Green Spaces
Goa Namo Van SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘नमो वन योजने’अंतर्गत केंद्र सरकारने प्रत्येक प्रकल्पासाठी सहा कोटी रुपयांपर्यंतच्या अर्थसहाय्याला मंजुरी दिलेली असल्याने, या अर्थसहाय्याचा वापर करून राज्यातील शहरी भागांचे ‘हरित क्षेत्रां’मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी पालिका क्षेत्रांतील जागांची निवड करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

‘नमो वन योजने’अंतर्गत सोनसोडो येथील जुन्या कचरा डेपोचे हरित क्षेत्रात रूपांतर करण्यास राज्य सरकारला यश मिळालेले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रकल्पाला सहा कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्याचा लाभ घेऊन सोनसोडोप्रमाणेच शहरी भागांमध्ये हरित क्षेत्रे तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल,’’ असे मंत्री राणे म्हणाले.

Goa Urban Green Spaces
Maja Flat Scheme Goa: 'माझा फ्लॅट' योजनेचा मोठा दिलासा! 'सेलडीड' नसलेल्या हजारो फ्लॅटधारकांना अखेर मिळणार कायदेशीर हक्क

दरम्यान, सोनसोडो हे एकेकाळी कचऱ्याचे डम्पिंग यार्ड म्हणून ओळखले जात होते. काहीच वर्षांपूर्वी राज्य सरकारने केंद्राच्या ‘नमो वन योजने’अंतर्गत त्याचे हरित क्षेत्रात रूपांतर केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ५०० झाडांची लागवड पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर हरित पट्टा वाढवण्यासाठी या भागांत हजारो झाडांची लागवड करण्यात आली. त्याच पद्धतीने यावेळी केंद्राच्या मदतीचा लाभ घेऊन शहरी भागांत हरित पट्टे वाढवण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com