Haj Yatra: ३०० हून अधिक हाज यात्रेकरू झाल्यास गोव्यातूनच थेट विमान; उर्फान मुल्लांची माहिती

Urfan Mulla: जास्तीत जास्त गोमंतकीय मुस्लिम बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन
Urfan Mulla: जास्तीत जास्त गोमंतकीय मुस्लिम बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन
urfan mullaDainik Gomantak
Published on
Updated on

Haj Yatra 2024

सासष्टी: हाज यात्रेला जाण्यासाठीचे अर्ज उपलब्ध असून, प्रक्रिया सुरू झाली आहे. गोव्यातून सरासरी १७० हाज यात्रेकरू जातात. ही संख्या ३०० पार झाली तर गोव्यातूनच थेट विमानाची व्यवस्था करणे शक्य असल्याचे गोवा राज्य हाज समितीचे चेअरमन उर्फान मुल्ला यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जास्तीत जास्त गोमंतकीय मुस्लिम बांधवांनी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. गोव्यातून हाज यात्रेस जाण्यासाठी प्रत्येकी केवळ ३.२१ लाख रुपये भरावे लागतात व ही रक्कम इतर राज्यांच्या तुलनेत व काही एजन्टांच्या तुलनेत पुष्कळच कमी असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी १६२ हाजी हाज यात्रेला गेले होते. तिथे उष्णतेमुळे गोंधळ झाला. काही हाजींचे निधन झाले. पण गोव्यातून गेलेले सर्व हाजी सुखरुप परतले. तेव्हा केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक तसेच राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचे पुष्कळ सहकार्य लाभले, असेही मुल्ला यांनी सांगितले.

केंद्र सरकारने हाज यात्रेसाठीचे नियम सुटसुटीत केले असून मेहराम कलम रद्द केले आहे. त्यामुळे आता महिलांना एकटे जाण्याची मुभा देण्यात येते, असेही मुल्ला याने सांगितले,

उर्फान मुल्ला पुढे म्हणाले, सरकारने गोवा राज्य हाज समितीसाठी स्वतंत्र सदस्य सचिव द्यावा तसेच अनुदानातही वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. सध्या सरकारकडून केवळ ३० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यातुन हाज यात्रेकरूंची व्यवस्था होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Urfan Mulla: जास्तीत जास्त गोमंतकीय मुस्लिम बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन
Saudi Arabia Haj Yatra: हज यात्रेला गेलेल्या 98 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने केली पुष्टी

प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी!

कोलकाता येथील महिला डॉक्टवरील अत्त्याचारानंतर झालेल्या खुनाची घटना निषेधार्ह आहे. तिथे एक महिला मुख्यमंत्री असताना महिलांवर अत्याचार होणे निंदनीय आहे. यातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अपयश सिद्ध होते. केंद्र सरकारने बंगालमधील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी उर्फान मुल्ला यांनी केली. तसेच बांगला देशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्त्याचारांचाही त्यांनी निषेध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com