Trojan Demello: अमली पदार्थ कारवाईवरुन मुख्यमंत्र्यांनी गोमंतकियांची दिशाभूल केली

ट्रोजन डिमेलो: सोनाली फोगट यांच्या हत्येवरून ड्रग्ज सहज उपलब्ध होत असल्याचं सिद्ध होतं
Trojan demello
Trojan demelloDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात अमली पदार्थाविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरु आहे. असे असले तरी एका कारवाईमध्ये जप्त केलेले अमली पदार्थ पदार्थ पुरावा कक्षातून (Evidence Room) गायब झाल्याचा आरोप करत टीएमसीचे मीडिया समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी गोवा मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

(Goa TMC alleged CM making half-baked assurances on drug menace)

Trojan demello
Goa Water Problem: डिचोली येथे पाणीटंचाई कायम; तर मुळगावात पाण्याची नासाडी

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा तृणमूल काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी टीएमसीचे मीडिया समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी 2010, 2012 या सालासह नुकतेच एका प्रकरणातील अमली पदार्थ पुरावा कक्षातून गायब झाली होते. याबाबत सरकारवर टीकास्त्र सोडले.

Trojan demello
Goa news: भाजप आमदार गणेश गावकर यांची प्रकृती स्थिर; खासगी दौऱ्यानिमित्त आहेत श्रीलंकेत

डिमेलो म्हणाले की, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्यातील अंमली पदार्थांच्या कारवाई बाबत अर्धसत्य माहिती देत आहे. एका कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ पुरावा कक्षातून गायब होतात. यावरुनच मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोवावासीयांची दिशाभूल केली आहे.

मंत्री रवी नाईक आणि मंत्री रोहन खंवटे यांचा घेतला खरफूस समाचार

2010 मध्ये 24 किलो अमली पदार्थ गायब झाल्याची चौकशी करण्याचे आश्वासन देणारे कृषी मंत्री रवी नाईक आणि मंत्री रोहन खंवटे यांचाही डिमेलो यांनी खरफूस समाचार घेतला. “अमली पदार्थांच्या दुर्व्यवहारासाठी स्थलांतरित मजूर आणि परदेशी लोकांना जबाबदार धरणारे मुख्यमंत्र्यांचे नुकतेच विधान गोव्यातील लोकांची दिशाभूल करणारे आहे.

भाजप 2012 पासून गोव्यात सत्ता आहे. तेव्हापासून आम्हाला स्थानिक राजकारणी आणि पोलिसांसोबत ड्रग्ज माफियांचा संबंध आढळतो. अंमली पदार्थ विरोधी सेल चांगले काम करत असेल तर अमली पदार्थ खेड्यांपर्यंत कसे पोहोचले असा सवाल ही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com