Goa Tiger Death: पट्टेरी वाघाच्या अवयवांची तस्करी? दात आणि नखे गायब, शिकारीच्या संशयानं तपास तीव्र; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

Tiger Poaching Suspected Goa: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील मुरगे-आगलोट येथे कुजलेल्‍या स्‍थितीत आढळलेल्‍या पट्टेरी वाघाच्‍या मृतदेहाची रविवारी मोले येथील निसर्ग परिचय केंद्रात उत्तरीय तपासणी करण्‍यात आली.
Tiger Poaching Suspected Goa
Goa Tiger DeathDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील मुरगे-आगलोट येथे कुजलेल्‍या स्‍थितीत आढळलेल्‍या पट्टेरी वाघाच्‍या मृतदेहाची रविवारी मोले येथील निसर्ग परिचय केंद्रात उत्तरीय तपासणी करण्‍यात आली. शवविच्‍छेदनाचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर वाघाचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला, हे स्‍पष्‍ट होणार असल्‍याने वन खात्‍याचे लक्ष या अहवालाकडे लागून आहे.

‘‘राष्‍ट्रीय व्‍याघ्र संवर्धन प्राधिकरणासह वन आणि पशुपालन आणि पशुसंवर्धन मंत्रालयाच्‍या तीन डॉक्‍टरांनी रविवारी गोव्‍यात येऊन मृतावस्‍थेत सापडलेल्‍या पट्टेरी वाघाच्‍या शवाचे मोले येथील निसर्ग परिचय केंद्रात विच्‍छेदन केले. त्‍याचा अहवाल नेमका कधी मिळेल, हे सांगता येत नाही. अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतरच वाघाचा नेमका कशामुळे मृत्‍यू झाला? हे स्‍पष्‍ट होईल. त्‍यानंतरच आम्‍ही या विषयावर सविस्‍तर भाष्‍य करू’’, असे उपवनसंरक्षक जीस वर्की यांनी ‘गोमन्‍तक’ला सांगितले.

Tiger Poaching Suspected Goa
Goa Crime: बंद खोलीत आढळला उत्तर प्रदेशच्या तरुणाचा मृतदेह, कुंकळ्ळीत उडाली खळबळ; पोलिसांनी नाकारला घातपाताचा संशय

२००९ ते २०१९ या दहा वर्षांच्‍या काळात राज्‍यात एकूण पाच वाघांचे मृतदेह आढळले होते. त्‍यानंतर आता यावर्षी मुरगे-आगलोट येथे सहाव्‍या पट्टेरी वाघाचा मृतदेह सापडला. त्‍याचे दात आणि नखे गायब असल्‍याचेही निदर्शनास आले. त्‍यामुळे संबंधित वाघाची शिकार करण्‍यात आल्‍याचा संशय बळावला असून, शवविच्‍छेदन अहवालानंतरच यातील सत्‍य समोर येणार आहे. या प्रकरणानंतर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी तत्‍काळ संबंधित ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली होती.

Tiger Poaching Suspected Goa
Goa Accident Death: 98 दिवसांत 66 जणांचे बळी, दर तिसऱ्या दिवशी एक मृत्यू; 80 टक्के अपघातांत दुचाकी

सरकारने स्‍पष्‍टीकरण देणे गरजेचे : केरकर

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी रविवारीही मुरगे-आगलोट भागाला भेट देऊन वाघाचा मृतदेह आढळलेल्‍या ठिकाणाची पाहणी केली. त्‍यानंतर ‘गोमन्‍तक’शी बोलताना, ‘‘ज्‍या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला, ती जागा स्‍वच्‍छ केलेली होती. परंतु, या प्रकाराबाबत वन खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी आपल्‍याशी सविस्‍तर भाष्‍य केले नाही. सरकारने याबाबत तत्‍काळ स्‍पष्‍टीकरण देणे गरजेचे आहे’’, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com