Goa: खवळलेल्या समुद्रात तीन बोटी बुडाल्या

कोणतीही जीवितहानी नाही मात्र लाखोंचे नुकसान (Goa)
Fisherman unraveling the net, In Goa. On Monday, 02 Aug, 2021.
Fisherman unraveling the net, In Goa. On Monday, 02 Aug, 2021.Sushant Counclikar / Dainik Gomantak

मडगाव: सध्या गोव्यात (Goa) मासेमारी (Fishing) सुरू झाली. तरी खवळलेल्या दर्याशी (Turbulent sea) मच्छिमारांना सामना करावा लागत असून काल व आज असे सतत दोन दिवस लाटांचा तडाखा बसून तीन बोटी बुडल्याची (3 boats sank) माहिती मिळाली आहे. या तिन्ही घटनांत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आज कोलवा (Colva) येथे मासेमारीसाठी दर्यात गेलेली होडी लाटांच्या तडाख्यात उलटी झाल्याने 15 खलाशी पाण्यात पडले मात्र त्या सर्वांना जीव रक्षकांनी (Life Guard) सुखरुप किनाऱ्यावर आणले.

Fisherman unraveling the net, In Goa. On Monday, 02 Aug, 2021.
Goa: आग्वाद येथील पुरातन तुरुंगाच्या सुशोभीकरणाच्या कामात पावसामुळे अनेक अडचणी

काल वार्का (Varca) आणि बाणावली (Benaulim) येथे अशा दोन घटना घडल्या होत्या. वार्का येथे लाटांच्या तडाख्याने होडी फुटून पडली. त्यातील सुमारे 10 लोकांना किनाऱ्यावर आणण्यात जीव रक्षकांना यश आले. बाणावली येथे मच्छिमाराच्या जाळ्यांची हानी झाली. बाणावली येथील मच्छिमार पेले फेर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या समुद्र खवळलेला असल्याने या दुर्घटना झाल्या. पण याच काळात मासे जास्त मिळत असल्याने मच्छिमार आपला जीव धोक्यात घालून होड्या पाण्यात सोडतात असे त्यांनी सांगितले (Fishing). समुद्र खवळलेला असल्याने कुटबण येथे बरेचसे ट्रॉलर जेटीवरच नांगरून ठेवल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com