Goa: आग्वाद येथील पुरातन तुरुंगाच्या सुशोभीकरणाच्या कामात पावसामुळे अनेक अडचणी

कुंपणाचे दगड तसेच इतर साहित्य पाण्यात वाहून नुकसानी (Goa)
Stones of the prison fence at Aguad collapsed, Goa. On 02 July, 2021.
Stones of the prison fence at Aguad collapsed, Goa. On 02 July, 2021.Santosh Govekar / Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (Goa Tourism Development Corporation) स्वदेश दर्शन योजनेखाली सुशोभिकरण करण्यात आलेल्या पुरातन आग्वाद तुरुंगाच्या (Aguad Jail) समोरचा चिरेबंदी कुंपणाचा काही हिस्सा तसेच सुशोभिकरणासाठी वापरण्यात येत असलेले चिरे आणी इतर बांधकाम साहित्य पावसाच्या तडाख्यामुळे वाहून गेल्याची माहिती स्थांनिकांकडून मिळाली. दरम्यान, अंदाजे बावीस कोटी रुपये खर्च (22 Crore) करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येत असलेल्या येथील तुरुंगाचे सध्या वस्तू संग्रहालयात (Museum) रुपांतर करण्यात आलेले आहे. (Goa)

Stones of the prison fence at Aguad collapsed, Goa. On 02 July, 2021.
Goa Covid-19: पर्यटकांच्या संख्येत वाढ; संसर्गाची भीती

येथील संग्रहालयात गोवा मुक्ती संग्रामात (Goa Liberation) सहभागी झालेल्या तसेच तत्कालीन पोर्तुगीज राजवटीखाली (Portuguese monarchy) तुरुंगवास भोगलेल्या थोर  स्वातंत्र्य सेनानी (Freedom Fighter) डॉ. राम मनोहर लोहिया (Dr. Ram Manohar Lohiya) आणी डॉ. त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा (Dr T B Kunha) तसेच अन्य स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित वस्तू  त्यावेळचा शस्त्रसाठा आणी इतर आठवणीं  पुढील पीढीच्या अभ्यासासाठी  संग्रहीत करून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com