Goa: डिचोलीतील 'ती तीन घरे' अखेर प्रकाशमय

माजी आमदारांच्या प्रयत्नातून सौर ऊर्जेवरील(Solar Energy) वीज (Goa)
Former MLA Naresh Sawal and others after power supply to the house, Goa. On 05 Aug, 2021.
Former MLA Naresh Sawal and others after power supply to the house, Goa. On 05 Aug, 2021. Tukaram Sawant / Dainik Goamantak

Bicholim: गोवा मुक्तीनंतर (After the liberation of Goa) तब्बल 60 वर्षांनी डिचोली मतदारसंघातील (Bicholim Constituency) दोडामार्ग - गोवा गेटजवळील (Near Dodamarg - Goa Gate) तीन घरे अखेर प्रकाशमय (Lighted) झाली आहेत. डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ (Former MLA Naresh Sawal) यांच्या प्रयत्नातून गोवा सौर ऊर्जा विकास यंत्रणेतर्फे (Goa Solar Energy Development System) तीन घरांना सौर ऊर्जेवरील वीज उपलब्ध झाली आहे. यात धनगर समाजातील (Dhangar Samaj) एका कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाला आहे. माजी आमदार नरेश सावळ यांच्याच उपस्थितीत या घरांनी सौर ऊर्जेवरील विजेचे दिवे प्रकाशित करण्यात आले. यावेळी धनगर समाजोन्नती मंडळ डिचोली तालुक्याचे अध्यक्ष दिलीप वरक उपस्थित होते. (Goa)

Former MLA Naresh Sawal and others after power supply to the house, Goa. On 05 Aug, 2021.
Goa: मांद्रे ऑफ कॉलेजला एका टप्प्यात अनुदान देणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

गोवा मुक्तीनंतर कालपर्यंत दोडामार्ग-गोवा गेटजवळील धनगर समाजातील बाबी सखाराम शिंदे यांच्यासह बाबनी महादेव गावस आणि राजन महादेव गावस यांच्या मिळून तीन घरात वीज पोचली नव्हती. त्यामुळे या तिन्ही कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. अखेर या तिन्ही घरांनी सौर ऊर्जेवरील वीज पेटताच, तिन्ही घरांतील मुलांबाळांसह सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे. या उपेक्षित घरांनी सौर ऊर्जेवरील का असेना, वीज पेटल्याने नरेश सावळ यांनी समाधान व्यक्त केले आहे. अन्य समाजातील दोन घरांसह धनगर समाज बांधव कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल धनगर समाजोन्नती मंडळ डिचोली तालुक्याचे अध्यक्ष दिलीप वरक यांनी आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com