मोरजी: मांद्रे ऑफ कॉलेजची (Mandrem of Collage) स्थापना मागच्या दहा वर्षापासून झाली होती, आजपर्यंत या कॉलेजला सरकारकडून अनुदान (Government Grants) मिळत नसे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हे अनुदान देण्याची तयारी सरकारने सहा टप्प्यात केली होती, परंतु आता हे अनुदान केवळ एका टप्प्यात पूर्ण दिले जाईल (Government Grants in One Phase), शिवाय या वर्षापासून मेंटेनन्स अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Dr Pramod sawant) यांनी माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप (Former Union Minister Ramakant Khalap) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स विध्यालयाचे विधिवत उद्घाटन केल्यानंतर केली. (Goa)
५ रोजी मांद्रे येथील दीनदयाळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते (Opposition Leader) दिगंबर कामत (Digambar Kamat), मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (Mandrem MLA Dayanand Sopate). मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर, वकील सुरेंद्र देसाई, निर्मला खलप, पराग राव, नंदन सावंत, उच्च्माधमिक शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, आश्विन खलप, अमित सावंत, नामदेव सावंत, चंद्रकांत साळगावकर, रमेश शेटमांद्रेकर, महेश मांद्रेकर, सुभाष वेलिंगकर, प्राचार्य अन्वेरकर, युनिवर्सिटी चे उपकुलगुरू वरुण सहानी आदी उपस्थित होते. प्रा.अरुण नाईक यांनी परिचय, नेहा पार्सेकर, अनघा आजगावकर, वरदा तळकर, नेहा पार्सेकर व गौरी नाईक आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
१५ ऑगस्ट २०२२ मोपा उड्डाण
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळामुळे केवळ पेडणेचा नव्हे तर पूर्ण राज्याच्या विकासाला हातभार लागून चेहरा मोहरा बदलणार आहे, १५ ऑगस्ट २०२२ रोजी पहिले विमान मोपा विमानतळावरून उड्डाण होईल अशी ग्वाही दिली.
शिक्षण क्षेत्रात राजकारण नाही
मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी आपण कधी शिक्षणक्षेत्रात राजकारण आणले नाही कुणीही आणू नये, या पुढे कशीच अडचण मांद्रे कॉलेजला येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
त्रीसंगम योग
मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी भाई खलप याना शुभेच्छा देताना खलप यांच्याकडून राज्याची आणि देशाचीही लोकसेवा व्हावी, असे म्हटले त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी बोलताना हा त्रीसंगम आहे, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि स्थानिक आमदार दयानंद सोपटे हे एकाच व्यासपीठावर येण्याचा हा योगायोग आहे. दिगंबर कामत यांनी ठरवले तर राज्याची किंवा लोकसभेचा उमेदवार खलप याना देवू शकतात. भाई खलप याना उमेदवारी मिळाल्यानंतर लोक ठरवतील आमदार कि खासदार ते. असे सांगितले.
दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बोलताना खलप यांनी आजच्या दिनी आपल्यासाठी काहीही मागितले नाही, त्यांनी विधार्थ्यांच्या भवितव्यासाठी काही कोर्सेस मागितलेले आहे, मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी आजच्या दिनी खलपाना मागणीची भेट द्यावी, असे आवाहन करून याही पुढे खलप यांच्या हातातून राज्याची आणि देशाची सेवा करण्याची त्याना संधी मिळावी, अशी आशा व्यक्त केली. खलप हे चौफेर अभ्यास करणारे नेते आहेत, स्वतःसाठी कधी त्यांनी मागितले नाही, असे सांगून गुरुपोर्णिमेदिवशी खलप यांनी माजी प्रतप्रधान देवेगौडा यांची भेट घेवून त्यांचे आशीवाद घेतले, त्यावेळी खलप गौडा याना म्हणाले तुम्ही मला केंद्रीयमंत्री बनवलात त्यासाठी आपण आशीर्वाद घेतो, असे म्हंटले होते त्यावेळी आपणही या वेळी उपस्थित होतो, हल्ली कुणी कुणाची आठवण ठेवत नसल्याचे ते म्हणाले.
आमदार दयानंद सोपटे
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना या कॉलेज मध्ये राजकारण घुसवून अन्याय केलेला आहे, त्याला शिक्षा मिळालेली आहे, या पुढे कुणीही शिक्षण क्षेत्रात राजकारण करू नये असा सल्ला देत, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आपण या कॉलेजचा विषय त्यांच्याकडे मांडला होता, त्यांनी कॉलेजला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती, परंतु काही जणांच्या राजकीय हट्टा पोटी अन्याय केला असे सांगितले .
रमाकांत खलप
माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी मनोगत व्यक्त करताना आता पर्यंत शिक्षण क्षेत्रात कश्या अडचणी आल्या त्याविषयी माहिती देताना यापुढेही जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी. शिवाय ज्यांनी ज्यांनी कॉलेजसाठी मदत केली त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सुरुवातील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या हस्ते कॉलेजच्या नामफलकाचे अनावरण झाले, मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले. मांद्रे विकास परिषद सचिव एन. जे. नाईक यांनी गौरव मूर्तींचा परिचय केला. शेवटी वकील सुरेंद्र सरदेसाई पराग राव व नंदन सावंत यांचा सत्कार मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी मोठ्या संखेने नागरिक हजर होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.