Goa Theft: चिखलीत मोलकरणीचा 7 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; 2 लाखाची रोकडही लुटली...

मोलकरीण पोलिसांच्या ताब्यात
Goa Chicalim Theft
Goa Chicalim TheftDainik Gomatak

Goa Theft: गोव्यातील चिखली येथे आल्त-दाबोळी परिसरात हॅमिल्टन फुर्तादो यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला चोरी प्रकरणात आज, मंगळवारी दुपारी वास्को पोलिसांनी अटक केली. ही मोलकरीण काम करता करता अधूनमधून मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास करायची, असा संशय तिच्यावर आहे.

25 सप्टेंबर रोजी फुर्तादो यांच्या घरातील 6 लाख 90 हजार रूपये किंमतीचे दागिने आणि सुमारे दोन लाख रूपयांची रोकड असा एकूण 8 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे फुर्तादो यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Goa Chicalim Theft
Goa Traffic Challan: वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या 29 हजार 338 जणांना पाठवले दंडाचे चलन

अधिक माहीतीनुसार त्या महिला मोलकरणीची चौकशी करताना पोलिसांना या प्रकरणात अन्य एका महिलेचा हात असण्याचा संशय निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी त्या मोलकरणीसह अन्य एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

त्यांची वृद्ध जोडप्याच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणात कसून चौकशी सुरु आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

Goa Chicalim Theft
Goa Medical College: राज्य माहिती आयोगाची 'गोमॅको'च्या अधिकाऱ्याला नोटीस; 'आरटीआय'अंतर्गत दिली होती अपुरी माहिती

73 वर्षीय हॅमिल्टन फुर्तादो यांनी घरकामासाठी एक मोलकरणी ठेवली होती. घरातील चोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. फुर्तादो यांच्या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या मोलकरणीकडे चौकशी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com