जो उमेदवार व पक्ष स्वबळावर जिंकण्याची क्षमता असते त्याला युतीची गरज नसते , ज्याचा पराभव होण्याची शक्यता असते अश्या उमेदवार आणि पक्षाला युती शिवाय पर्याय नाही , आणि युती झाली तरी मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदार संघात मगोचेचे उमेदवार असतील असा पुनरुच्चार मांद्रेचे (Mandre) मगोचे अधिकृत उमेदवार जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले.
मगो पक्षाने सर्वात प्रथम निवडणुकीला सहा महिने असताना मांद्रे मधून पहिला उमेदवार जीत आरोलकर यांच्या नावाची घोषणा केल्याने मान्द्रेत जीत आरोलकर यांचे समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मांद्रे मतदार संघ हा मगोचा बालेकिल्ला समजला जातो ,या मतदार संघातून या पूर्वी आठ वेळा मगोचे उमेदवार निवडून आले आहे, भाजपाचे पार्सेकर तीन वेळा , कॉंग्रेसच्या तिकिटावर संगीता परब (Sangeeta Parab) व दयानंद सोपटे (Dayanand Sopte) एकदा ,शिवाय पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर दयानंद सोपटे विजयी ठरले रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांच्या नंतर या मतदार संघात मगोला आपले खाते खोलता आले नाही. आता जीत आरोलकर यांच्या रूपाने मगो पक्ष आणि कार्यकर्त्ये मगोच्या विजयासाठी आतुरलेले आहेत.
मांद्रे मधून जीत आरोलकर याना मगो पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकारांकडे बोलताना त्यांनी ज्यांच्याकडे स्वबळावर जिंकण्याची क्षमता असते त्या उमेदवार आणि पक्षाला युतीची गरज नाही , जर मगोकडे कुणाला युती करायची तर त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे संपर्क करावा असे आवाहन जीत आरोलकर यांनी केले.
मगो बरोबर यापुढेही जरी कोणत्याही पक्षाने युती केली तरीही पेडणे तालुक्यातील पेडणे आणि मांद्रे हे दोन्ही मतदार संघ मगोच्या उमेदवारांनाच सोडावे लागेल आणि दोन्ही ठिकाणी मगोच्या उमेदवाराना जिंकण्याची १०० टक्के खात्री आहे.असा विश्वास जीत आरोलकर यांनी व्यक्त केला आहे .
आपला प्रतिस्पर्धक सोपटे
२०२२ च्या निवडणुकीतही आपला प्रतिस्पर्धक केवळ आमदार दयानंद सोपटे हेच आहेत त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण होत असून त्याचा फायदा आपल्याला होईल असा दावा जीत आरोलकर यांनी केला. माजी मुख्यमंत्री पार्सेकर (Former Chief Minister Parsekar) व दीपक कलंगुटकर (Deepak Calangutkar) यांचे मागच्या निवडणुकीत तुमच्यासाठी किती योगदान होते असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता दीपक कलंगुट आणि माजी मुख्यमंत्री प्रा. पार्सेकर यांनी कुणासाठी काम केले ते त्यांनाच माहित असणार आणि आपण निवडून आलो असतो तर पुढच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी आपण घेईल या भीतीपोटी त्यांनी आपल्याला काम केले नाही असा दावा जीत आरोलकर यांनी केला.
सरकारला फटका बसणार
कोरोना काळात (Covid 19) सरकारचे योग्य ते नियोजन नसताना महामारीत लोकाना त्रासात टाकण्याचे काम सरकारने केले आहे , मदत कार्य सरकारकडून सर्वसामान्यां नागरिकाना पोचली नाही ,मात्र सामाजिक कार्यकर्त्ये नागरिक हितचिंतकानी या काळात गरजवंताना मदत केली , कोरोना काळाचा फटका सरकारला बसणार आणि त्याचा लाभ आपल्याला मिळणार असा दावा जीत आरोलकर यांनी केला.
मान्द्रेतील जनता मगो पक्षाला येत्या निवडणुकीत नक्कीच संधी देणार असा दावा करून, मतदार संघाचा कोणत्या प्रकारे विकास केला याविषयी माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी विवेचन सुंदर केले आहे , शिवाय सामाजिक माध्यमातून विकास केला नाही त्याचे संदेश व्हायीरल होत आहे .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.