Goa: माजी मंत्री स्व. हरिष झांट्ये यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका

गोव्यातल्या डिचोलीतील जनतेच्या सेवेसाठी माजी मंत्री तथा माजी खासदार स्व.हरिष (अण्णा) झांट्ये यांच्या स्मरणार्थ डिचोली पालिकेला रुग्णवाहिका देण्यात आली
डिचोलीतील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका
डिचोलीतील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका Image by Tukaram Sawant
Published on: 
Updated on: 

डिचोली: गोव्यातल्या (Goa) डिचोलीतील (Bicholim) जनतेच्या सेवेसाठी माजी मंत्री तथा माजी खासदार स्व.हरिष (अण्णा) झांट्ये यांच्या स्मरणार्थ डिचोली पालिकेला रुग्णवाहिका (Ambulance) देण्यात आली आहे. (Goa: Ambulance service started for the citizens of Bicholim)

डिचोलीतील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका
Goa Covid 19: ‘कोविड’च्या मृत्यूदरात देशात गोवा तिसरा

झांट्ये उद्योग समूहातर्फे ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. गुरुवारी (ता.1) डिचोलीत आयोजित एका कार्यक्रमात डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पुंडलिक (कुंदन) फळारी आणि मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देण्यात आली.

यावेळी स्व. अण्णा झांट्ये यांचे पूत्र तथा मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, झांट्ये ग्रूपचे सुरेश झांट्ये, उमेश झांट्ये, सिद्धार्थ झांट्ये आणि रोहित झांट्ये उपस्थित होते. अन्य मान्यवरात नगरसेवक सतिश गावकर, रियाज बेग, निलेश टोपले, अनिकेत चणेकर, दीपा शिरगावकर, दीपा पळ, ऍड. अपर्णा फोगेरी, ऍड. रंजना वायंगणकर, सुखदा तेली, पांडुरंग कोरगावकर यांचा समावेश होता. रोहित झांट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com