Goa Politics: आगामी गोवा दौऱ्यात आघाडीविषयी चर्चा करू, शरद पवार

विधानसभेच्या येत्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डसोबत (Goa Forward) आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत चर्चा
Goa Politics: Sharad Pawar
Goa Politics: Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभेच्या येत्या निवडणुकीत कॉंग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्डसोबत (Goa Forward) आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी यासंदर्भात आपल्या आगामी गोवा दौऱ्यात चर्चा करू, असे आश्वासन दिले. (Goa NCP State General Secretary Sanjay Barde called on Sharad Pawar)

बर्डे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की ही कोणतीही पूर्वनियोजित भेट नव्हती. मात्र, पक्षाचे संघटनात्मक काम मजबूत करण्याची गरज असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ही भेट घेण्यात आली. या चर्चेदरम्यान बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव भाजपकडे कसे झुकतात आणि पक्ष संघटनेचे ते काम कसे करत नाहीत, याचीही माहिती देण्यात आली.

Goa Politics: Sharad Pawar
Goa: गोवेकरांच्या डोक्यावरचा ‘भार’ कमी होणार!

पक्ष संघटना मजबूत करण्याची सूचना

शिवोली, म्हापसा, साखळी व मांद्रे मतदारसंघांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा करावा, असे बर्डे यांनी पवार यांना सुचवल्याचे सांगण्यात आले. उत्तर गोव्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बर्डे यांनी काम करावे, अशी सूचना पवार यांनी यावेळी केली.

धावा धावा, कोण पुढे पळे तो

गोवा विधानसभा निवडणूक जवळ आल्याने उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याचे काम इच्छुकांनी सुरू केले आहे. राष्ट्रीयच नव्हे, तर स्थनिक पक्षांच्या दालनातही हेच चित्र आहे. निवडणूक जवळ आल्यावर आपली दुकाने थाटणारेही पक्ष गोव्याने पाहिले आहेत आणि त्यांच्याकडेही हेच चित्र दिसले म्हणून नवल नाही. प्रमुख पक्षांकडे सध्या एकेका मतदारसंघात एकाहून अधिक तर काही ठिकाणी तीनसुध्दा उमेदवार प्रयत्नशील आहेत.

कॉंग्रेसने तर 35 मतदारसंघांत नवे चेहरे मैदानात उतरविण्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत; पण कॉंग्रेसचा मनसुबा प्रत्यक्षात कसा खरा ठरणार हा प्रश्र्न आहे. कारण सध्या त्या पक्षाचे जे पाच आमदार आहेत, त्यात पाच माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नवे चेहरे कसे असणार हा खरा प्रश्र्न आहे. पण तेथेही उमेदवारीसाठी शर्यत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com