मोरजी : आंतरराष्ट्रीय किर्तीचे फॅशन डिझायनर (International Fashion Designer) आणि पद्मश्री पुरस्कार विजेते (Padmshri Award Winer) वेंडेल रॉड्रिक्स यांच्या कलात्मकतेबरोबरच कोलवाळ - बार्देश गाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. त्यांची कलात्मकता अजरामर ठेवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी वास्तू शिल्पकारांच्या रचनेतून पुरातन संग्रहालय बनवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. किनारी भागात येणाऱ्या पर्यटकाना हे संग्रहालय एक पर्वणी ठरणार आहे.
असे असेल दालन
या संग्रहालयात विविध प्रकारची दालने असतील. त्यात वाचनालय, त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देणारा माहितीपट, वेगवेगळे फोटो, पुरातन वस्तूंची दालने असतील. त्या पलीकडे या पुरातन वास्तू संग्रहालयात भेटी देण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी व वेंडेल रॉड्रिक्स यांच्या कार्याची जवळून माहिती घेण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक अभ्यासक या गॅलरीला भेटी देणार आहेत.
साडेचारशे वर्षांपूर्वीचे घर
वेंडेल रॉड्रिक्स हे १९९३ पासून कोलवाळ येथील ४५० वर्षांच्या जुन्या घरात राहत होते. त्या घराचे नाव ‘कासा डोना मारिया’, असे होते. आता त्या घराचे गोवा फॅशनच्या संग्रहालयात रूपांतरित केले, असून ‘मोडा गोवा संग्रहालय आणि संशोधन केंद्र’ असे नामकरण केले आहे. मार्च २०२० मध्ये हे संग्रहालय लोकांसाठी खुले केले जाणार होते. परंतु, कामाला विलंब झाल्याने आणखी किमान दोन वर्षे लागतील, असा अंदाज आहे. वेंडेल यांचे काही मित्र स्वत: या संग्रहालयाचे काम करीत आहेत. काहीजण कामावर लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहेत. वेंडेल यांचे कुटुंबीय सध्या विदेशात असल्याने मित्र, सहकारी हे काम पाहत आहेत. संग्रहालयाची सध्या रंगरंगोटी सुरू आहे.
फॅशन डिझायनर कारकीर्द
वेंडेल रॉड्रिक्स यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात गार्डन वरेली, लॅक्मे कॉस्मेटिक्स आणि डीबियर्ससाठी डिझाईन करून केली होती. जेव्हा पॅरिसमध्ये त्यांचा पहिला पोर्टफोलिओ हातात होता, तेव्हा त्यांनी देशाची संस्कृती आपल्या कपड्यांमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आला. मुंबईमध्ये ओबेरॉय हॉटेल, मुंबईच्या रिगल रूममध्ये आयोजित केलेल्या पहिल्या शोसह स्वतःचे लेबल लाँच केले होते. त्यांच्या पहिल्या संग्रहात मॉडेल मेहर जेसियासह बारा जोड्या होत्या. यापैकी फक्त सहा पूर्ण पोशाख होते. वेंडेल यांच्या कामात जागतिक वेशभूषा इतिहासावर (एसएनडीटी महिला विद्यापीठात) व्याख्यान देण्यापासून ते फॅशन पत्रकारिता आणि आंतरराष्ट्रीय जाहिरात मोहिमेसाठी स्टाईल करण्यापर्यंत विविध प्रकारच्या फॅशनचा समावेश होता.
११९५ मध्ये जगविख्यात प्रसिद्धी
१९९५ मध्ये ‘आयजीईडीओ’ या जगातील सर्वांत मोठा वस्त्र मेळाव्यामध्ये त्यांना आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय डिझायनर होते. २००१ मध्ये दुबई फॅशन वीक उघडणारे पहिले भारतीय डिझायनर बनले. २००७ मध्ये पॅरिस फॅशन वीक प्रेट ए पोर्टर सलूनमध्ये सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते. ते फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाचे सहकारी डिझाईन सदस्य होते. रॉड्रिक्स हे रिसॉर्ट वेअरच्या कल्पनेसाठी अग्रगण्य आणि पर्यावरणास अनुकूल फॅशनचा पुरस्कार करण्यासाठी प्रसिद्ध होते. २०१० मध्ये त्यांनी कुणबी साडीच्या पारंपरिक गोव्याच्या पोशाखांचे पुनरुज्जीवन केले. वेंडेल यांनी २००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटात आणि २००२ मध्ये ‘ट्रू वेस्ट’ या टेलिव्हिजन नाटकात भूमिका साकारल्या. २००८ च्या ‘फॅशन’ चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.