Goa Weather Updates: काळजी घ्या! उकाडा वाढला; तापमानाचा पारा 33.6 अंशांवर

Goa Weather Updates: पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak

Goa Weather Updates: राज्यात मागील दोन आठवड्यापासून कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यात वाढलेल्या उष्म्‍यातून लोक घामाघून होत असून उष्म्याने अंगाची लाही-लाही होत आहे.

आज राज्यातील तापमानाचा कमाल पारा 33.6 अंश सेल्सिअस इतका वाढला आहे. राज्यातील आर्द्रतादेखील अधिक असल्याने तसेच सकाळपासून दमट वातावरण असल्याने उकाड्याने लोक त्रस्त झाले.

राज्यात गुरूवारी तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली होती. मात्र, कोठेही पाऊस पडल्याची नोंद नव्हती. पुढील पाच दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात मोठे बदल घडणार नाहीत.

त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. गुरूवारी राज्यातील कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस, तर किमान 26.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

Goa Weather Update
Goa Lok Sabha Election: बैठका, अंतर्गत प्रचार सुरू; मतदार मात्र विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर ठाम

दरम्यान वातावरणातील या बदलाचा आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील गावांमध्ये पहाटे हवामान काहीसे थंड जाणवते. मात्र जसजसा दिवस होत जातो तसतसा वातावरणात उकाडा वाढतो.

मागील काही दिवसात राज्यात ढगाळ हवामानही पाहायला मिळाले. यंदा काजूचे पीक दरवर्षीपेक्षा कमी आल्याने बागायतदार चिंतेत असून अशाप्रकारे वातावरणातील बदल होत असेल तर हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची शक्यता येथील बागायतदारांनी बोलून दाखवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com