Goa Teacher Recruitment
Goa Teacher RecruitmentDainik Gomantak

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

TET certificate Goa: गोवा कर्मचारी भरती आयोगाने माध्यमिक शिक्षक पदांसाठी निवडीच्या पात्रता यादीत समावेश केलेल्या उमेदवारांसमोर शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अडथळा उभा ठाकला आहे.
Published on

पणजी: गोवा कर्मचारी भरती आयोगाने माध्यमिक शिक्षक पदांसाठी निवडीच्या पात्रता यादीत समावेश केलेल्या उमेदवारांसमोर शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अडथळा उभा ठाकला आहे. या उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आयोगाला सादर करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची शिक्षक निवडीची संधी हुकणार आहे.

शिक्षकांच्या ११८ पदांसाठी आयोगाकडे ४ हजार ३०० जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८० टक्के जणांनी परीक्षा दिली. त्यातून २३६ जणांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. त्यातील अनेक जणांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याचे उघड झाले.

Goa Teacher Recruitment
Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

त्यामुळे त्यांची नियुक्ती करणे शक्य होणार नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. यासाठी कोणी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे, नाही याची पडताळणी आयोग करीत आहे.

Goa Teacher Recruitment
Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

आयोगाच्या नियमानुसार, सुरवातीला संगणकावर आधारीत परीक्षा घेतली जाते. शिक्षकांसाठी त्या विषयाचे ज्ञान तपासणारा एक विभाग परीक्षेत असतो. त्यानंतर जाहीर पदांच्या दुप्पट उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीसाठी केली जाते.

इतर पात्र उमेदवार त्यावेळी प्रतीक्षा यादीवर असतात. याही बाबतीत हीच पद्धत अवलंबण्यात आली मात्र शिक्षकपदी नियुक्तीसाठी टीईटी बंधनकारक असल्याने आता त्याची पूर्तता उमेदवार करतात की नाही हे तपासण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com