National Teacher Award: 'विशेष' कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान; मडगावच्या महादेव शिंदेंना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Mahadev Shinde National Teacher Award 2026: मडगाव येथील ‘गुजराती समाज विशेष शाळा’ चे शिक्षक महादेव शिंदे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.
Mahadev Shinde National Teacher Award 2026
National Teacher AwardDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विशेष मुलांच्या शिक्षणासाठी गेली तीन दशके समर्पितपणे कार्य करणारे मडगाव येथील ‘गुजराती समाज विशेष शाळा’ चे शिक्षक महादेव शिंदे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. विशेष मुलांसाठी कृती पुस्तिका, शैक्षणिक साहित्य आणि डिजिटल अध्ययन सामग्री विकसित करून ती शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे कामही शिंदे यांनी केले.

क्रीडा आणि योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, शिस्त आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. ते अनेक वर्षांपासून ढवळी (फोंडा) येथे राहत आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पालकांना मुलांच्या शिक्षणात सहभागी करून घेण्यासाठीही त्यांनी उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची २०२२ मध्ये छत्तीसगड सरकारने दखल घेऊन त्यांचा सन्मान केला होता. आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामुळे गोव्यातील विशेष शिक्षण क्षेत्रातील कार्याला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

Mahadev Shinde National Teacher Award 2026
Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

पंतप्रधानांकडूनही दखल

शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. भेटीत त्यांनी गुजराती समाज विशेष शाळेचे कार्य व विशेष मुलांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम सादर केले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, विशेष मुलांच्या क्षमता, त्यांच्या शिक्षणाचा अधिकार आणि समावेशक शिक्षणाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे. हा पुरस्कार विद्यार्थ्यांना, पालकांना आणि माझ्या कार्याला पाठबळ देणाऱ्या सर्वांना समर्पित करतो.”- महादेव शिंदे.

Mahadev Shinde National Teacher Award 2026
Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com