Goa Government Decision: गोव्यात दुकाने, मॉल्स आता 24 तास सुरू राहणार! सरकारचा मोठा निर्णय; 3 वर्षांसाठी परवानगी

Goa Shops Open 24 Hours: राज्‍य सरकारने ‘गोवा दुकाने आणि आस्थापने अधिनियम, २०२५’नुसार राज्‍यातील सर्व दुकाने, आस्‍थापने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्स २४ तास सुरू ठेवण्‍याची मुभा दिली आहे.
Goa Shops Open 24 Hours
Goa Government DecisionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍य सरकारने ‘गोवा दुकाने आणि आस्थापने अधिनियम, २०२५’नुसार राज्‍यातील सर्व दुकाने, आस्‍थापने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्स २४ तास सुरू ठेवण्‍याची मुभा दिली आहे. हा आदेश पुढील तीन वर्षांपर्यंत लागू असेल. कामगार खात्‍याने यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. खात्‍याचे अवर सचिव महेश हरी केदार यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

व्‍यवसाय सुलभतेसाठी सरकारने ‘गोवा दुकाने आणि आस्थापने (रोजगार आणि सेवा अटींचे विनियमन) अधिनियम, २०२५’नुसार सर्व आस्थापने, शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा मॉल्स २४ तास सुरू ठेवण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. हा आदेश तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या आदेशातील अटी व शर्थींचे उल्लंघन झाल्यास कायद्यातील नियमांनुसार संबंधित मालकाविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही अधिसूचनते म्‍हटले आहे.

Goa Shops Open 24 Hours
FC Goa New Coach: एफसी गोवाला मिळाला नवा कोच! स्पेनच्या आंजेल बियादेरो यांनी स्वीकारली सूत्रे, 21 नोव्हेंबरला पहिली कसोटी

आठवड्याला ४८ तासच काम

रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचा दिवस आठ तासांचा असेल. तर, रोजंदारीवर नसलेल्‍या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य कामकाजाचे तास हे एकूण आठवड्याच्‍या कामाचे तास ४८ तासांपेक्षा जास्त होणार नाहीत, अशा पद्धतीने निश्‍चित केले जावेत. कर्मचाऱ्यांच्‍या विश्रांतीचा कालावधी सरकारने अधिसूचित केल्याप्रमाणे असेल. आस्‍थापनांच्‍या आवारात, सर्वांना सहज दिसेल अशा ठिकाणी कामाचे तास, विश्रांतीचा कालावधी आणि साप्ताहिक सुट्टी दर्शवणारी सूचना प्रदर्शित करणे अनिवार्य असेल, असेही अधिसूचनेत म्‍हटले आहे.

पर्यटन, गुंतवणुकदारांना फायदा : गौरीश धोंड

‘‘राज्‍यातील दुकाने, शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स, मॉल्‍स २४ तास सुरू ठेवण्‍याच्‍या सरकारच्‍या निर्णयाचा राज्‍याच्‍या पर्यटनाला, गुंतवणुकदारांना मोठा फायदा मिळणार आहे. राज्‍यात आलेले पर्यटन आपल्‍या सोयीनुसार खरेदी करू शकतील. त्‍यामुळे सरकारच्‍या महसुलात वाढ होईल’’, अशी प्रतिक्रिया उद्योजक गौरीश धोंड यांनी दिली. ‘‘पर्यटकांसाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या आस्‍थापनांना २४ तास खुले राहण्‍याची परवानगी देत असताना, बार तसेच मद्यालयांवर मात्र निर्बंध असणे आवश्‍‍यक आहे’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

अशी आहे नियमावली

ई-सेवांचा लाभ घेण्यासाठी सरकारने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक व्यवहार किंवा सेवा शुल्काचा भरणा आस्‍थापनाच्‍या मालकाला करावा लागेल

दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्‍थापनाच्‍या मालकाला व्यवसाय सुरू केल्याची सूचना पत्र आणि आवश्‍‍यक दस्तावेज देणे अनिवार्य असेल

सूचना पत्र आणि दस्‍तावेज मिळाल्‍यानंतर अर्जदाराला ऑनलाइन पावती दिली जाईल

ज्या आस्थापनात दहापेक्षा कमी कर्मचारी काम करतात, अशा आस्थापनाचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करताना मालकाला त्‍याची माहिती देणारे पत्र मार्गदर्शन आणि मदतीसाठी नेमलेल्‍या अधिकाऱ्याला द्यावे लागेल

आस्थापनांचे परिसर स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवणे अनिवार्य. तेथे हवा खेळती राहण्‍याची व्‍यवस्‍था आणि प्रकाश असणे गरजेचे

मालकांना आस्थापनांत प्रथमोपचाराची उपकरणे आणि औषधे असलेली सुसज्ज प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक असेल

Goa Shops Open 24 Hours
Goa Government Performance: निवडणूक जवळ येताच सरकारचा कामाचा धडाका! मग मागील पावणेचार वर्षे फाईली का रखडल्या?

पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उपलब्ध असावी

कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वेतन, अतिरिक्त काम, आगाऊ रक्कम, दंड, कपात यांसारख्या तपशीलांच्या नोंदवह्या व इतर रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य असेल

नोंदवह्या आणि रेकॉर्ड शेवटची नोंद ज्या तारखेला झाली असेल, त्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी जतन करून ठेवणे आणि मार्गदर्शन व मदतीसाठी नेमलेल्‍या अधिकाऱ्याने मागणी केल्‍यास ती सादर करणे आवश्‍‍यक असेल

मालकांनी प्रत्येक वर्षाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या २८ किंवा २९ तारखेला किंवा त्यापूर्वी विहित पोर्टलवर ‘फॉर्म-जी’मध्‍ये विवरणपत्र अपलोड करणे अनिवार्य राहील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.