Mopa Taxi Protest Goa: ‘मोपा’वर 15 दिवसांत‘टॅक्सी स्टॅण्ड’

वाहतूक मंत्री गुदिन्हो : आश्‍वासनानंतर संघटनांचे धरणे आंदोलन स्थगित
Minister Mauvin Gudinho
Minister Mauvin Gudinho Gomantak Digital Team
Published on
Updated on

Mopa Taxi Protest Goa: दोन आठवड्यात ‘मोपा’ वर टॅक्सी स्टॅण्ड देण्याचे आश्वासन वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिल्यानंतर ग्रीन फील्ड एअरपोर्ट टॅक्सी व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशन या दोन्ही संघटनांनी १ मे पासून केलेले धरणे आंदोलन आज स्थगित केले.

मात्र, मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही यावेळी पत्रकारांशी बोलताना संघटनांच्या नेत्यांनी दिला.

आंदोलकांचे नेते भास्कर नारुलकर म्हणाले की ,आज आम्ही वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांची भेट घेतली तेव्हा आमच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यात मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅण्ड अधिसूचित करणे ,स्टॅण्ड वर १०० ते १५० टॅक्सींचा समावेश ,पेडणे तालुक्यातून सादर केलेले व१३४२ अर्ज ग्राह्य धरणे ,टॅक्सी स्टॅण्ड साठी किमान दर आकारणे ,लहान मुले असलेल्या विधवांसाठी प्राधान्य ह्या आमच्या मागण्या होत्या.

Minister Mauvin Gudinho
Ponda Municipal Election: भाटीकरांचे नेतृत्व निर्णायक ठरणार?

दोन आठवड्यांचा जरी कालावधी सांगितला तरी सगळे सोपस्कार लवकर पूर्ण झाल्यास त एका आठवड्यात हा टॅक्सी स्टँड सुरू होऊ शकतो. सुरूवातीला स्टँड वर ३०० टॅक्सींना परवाना देण्यात येईल. विमानांची जसजशी संख्या वाढेल तसतशी टॅक्सींची ही संख्या वाढवण्यात येईल, कुणालाच नाकार देण्यात येणार नाही.

माविन गुदिन्हो, वाहतूक मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com