Mopa Airport: 'ब्ल्यू कॅब काऊंटर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरु'! टॅक्सी व्यावसायिकांचा इशारा; तानावडेंना दिले निवेदन

Blue Cab Taxi App counter: काऊंटर लवकर सुरू करावा अन्यथा २६ जूनपासून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा टॅक्सी व्यावसायिक संघटनेने दिला आहे. त्यांनी खासदार सदानंद तानावडे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
Sadanad Tanavade, Mopa Blue Cab Taxi Counter
Sadanad Tanavade, Mopa Blue Cab Taxi CounterDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘ब्ल्यू कॅब टॅक्सी ॲप’ हा काउंटर तीन महिन्यांपासून बंद आहे. हा काऊंटर लवकरात लवकर सुरू करावा अन्यथा आम्ही २६ जूनपासून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा टॅक्सी व्यावसायिक संघटनेने दिला आहे. त्यांनी राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळी, संयुक्त खजिनदार महेश देसाई, सचिव रामचंद्र गावडे, चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस आदी उपस्थित होते. तानावडे यांनी शिष्टमंडळास आश्वासन देताना आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे या विषयावर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Sadanad Tanavade, Mopa Blue Cab Taxi Counter
Goa Taxi: ओला, उबर यांना गोव्यात थांबवणार कसे? ‘ॲग्रिगेटर’ला डावलणे बनले आव्हान; टॅक्सी व्यावसायिक गोंधळात

पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यातील युवकांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या नजरेतून कर्ज काढून टॅक्सी घेतल्या. परंतु त्यांना व्यवसाय मिळालेला नाही. सरकारी नोकऱ्या देण्याऐवजी सरकारने निदान टॅक्सी काउंटर उपलब्ध करून सहानभूतीपूर्वक विचार करण्याची गरज होती, असे मत टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले.

Sadanad Tanavade, Mopa Blue Cab Taxi Counter
Goa taxi App: ‘टॅक्सी अ‍ॅप’, ‘ॲग्रिगेटर’च्या पाठीशी गोमंतकीय ! 94 % नागरिकांचा ‘ॲप’ला पाठिंबा; TTAG चे सर्वेक्षण

तीन महिन्यांपासून या ‘ब्लू कॅब टॅक्सी व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आलेले नाहीत. भविष्यात बँक नोटीसाही पाठवू शकतात त्यामुळे आमचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com