Goa Taxi Aggregator Issue: 'ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर'चा प्रश्‍न सर्वांना विश्‍वासात घेऊन सोडवू, CM सावंतांची ग्वाही

Goa CM On Taxi Aggregator Issue: राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी उपस्थित केलेला वाहतूक संकलकाचा (ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर) प्रश्‍न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
Goa Taxi Aggregator Issue
Goa Taxi Aggregator IssueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी उपस्थित केलेला वाहतूक संकलकाचा (ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर) प्रश्‍न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले. पत्रकारांनी याविषयी अनेक प्रश्न विचारले असता त्यांनी एका ओळीत सरकार हा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवेल, असे नमूद केले.

दरम्यान कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आंदोलक टॅक्सी चालकांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ‘स्थानिक चालकांचे हक्क सरकारने डावलू नयेत,’ असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे, राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी या नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

Goa Taxi Aggregator Issue
Goa Cabinet Decision: गोमंतक संस्कृतीच्या रक्षणासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! 'वारसा धोरण 2025'ला दिली मंजुरी

सरकारने राज्यात वाहतूक संकलक नेमण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करत नवीन नियमांचा मसुदा अधिसूचित केला आहे. पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांत अस्वस्थता वाढली आहे.

नव्या नियमांनुसार, राज्यात अ‍ॅग्रीगेटर सेवा देणाऱ्या कंपन्यांना परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये सेवा दर, वाहनांची नोंदणी, ग्राहक तक्रार निवारण प्रणाली, डिजिटल व्यवहार, जीपीएस ट्रॅकिंगसारख्या अनेक अटींचा समावेश आहे.

या मसुद्यावर व्यावसायिक तसेच नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून त्यासाठी ३० दिवसांची मुदत जाहीर करण्यातआली आहे. मात्र, या नव्या योजनेमुळे पारंपरिक टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर गदा येईल, अशी भीती व्यक्त करून त्यांनी गोव्यात विविध ठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत.

विशेषतः उत्तर गोव्यातील पर्यटनप्रधान भागांमध्ये- कळंगुट, बागा, साळगाव-येथे तीव्र निषेध आंदोलन सुरू आहे.

Goa Taxi Aggregator Issue
Goa Horror story:'रात्रीची वेळ, अचानक असं काही घडलं आणि जागेवरच फिरायला लागली कार'; गोव्यात लागला 'चकवा', मराठी अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

सुरक्षित वाहतूक व्यवस्था हाच उद्देश

राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, ‘गोव्यात पारदर्शक आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे. नियम अंमलात आल्यास पर्यटकांनाही सुलभ सेवा उपलब्ध होईल.

’दरम्यान, यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात सर्वांना विश्वासात घेऊन तोडगा काढला जाईल, असे वक्तव्य करणे म्हणजे नव्या नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलणे असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com