Goa Tax Collection: राज्याच्या प्रत्यक्ष कर संकलनात सहा महिन्यांत 41 टक्के वाढ

पर्यटन, आदरातिथ्य, रियल इस्टेटमधून करसंकलन वाढले
Goa tax collection
Goa tax collection Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tax Collection: रियल इस्टेट, आदरातिथ्य आणि पर्यटन या क्षेत्रांतून मिळालेल्या करांमुळे गोव्याच्या प्रत्यक्ष कर संकलनात 41 टक्के वाढ झाली आहे. गोव्यातील स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. ही वाढ या वर्षातील सहा महिन्यांतील आहे.

दरम्यान, राज्याने आयकर आणि कॉर्पोरेट कर संकलनात वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत 664 कोटींपर्यंत लक्षणीय झेप घेतली आहे. गतवर्षी हे कर संकलन या कालावधीत 469 कोटी होते.

Goa tax collection
गोव्यातील हॉटेल बुकिंग शेवटच्या मिनिटाला केले कॅन्सल; ग्राहक न्यायालयाने MakeMyTrip, OYO ला ठोठावला दंड

राज्याच्या प्रत्यक्ष कराचा एक मोठा भाग (60 टक्के) आयकराचा आहे. यात चांगली करवसुली झाली आहे. 2023-24 या वर्षासाठी प्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट 1600 कोटी आहे, जे सहज साध्य होऊ शकते.

दरम्यान, गोव्याच्या आयकर बेसमध्ये आजपर्यंत रिटर्न भरणाऱ्या 1.62 लाख करदात्यांचा समावेश आहे.

कॉर्पोरेट टॅक्सच्या आघाडीवर, करदात्याची संख्या कमी आहे कारण गोव्यातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात MSME आहेत, जे कर कक्षेबाहेर आहेत. राज्यातील बहुतांश फार्मा कंपन्या आपला कर बाहेरून भरतात.

Goa tax collection
Vishwajit Rane: मोफत IVF उपचार करणारे गोवा ठरणार पहिले राज्य; 100 हून अधिक दाम्पत्यांनी केली नोंदणी

गेल्या दोन वर्षांत, राज्याचे प्रत्यक्ष कर संकलन 2021-22 मधील 1301 कोटींवरून 2022-23 मध्ये 1415 कोटी झाले. शिवाय नोव्हेंबर-मार्च या कालावधीत सुमारे 65 टक्के कर प्रवाह आहे.

गेल्या काही वर्षांत गोव्याच्या प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होत आहे. तथापि, खाण उद्योगाच्या महसुली तोट्याची भरपाई अद्याप कर संकलनातून झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com