गोव्यातील हॉटेल बुकिंग शेवटच्या मिनिटाला केले कॅन्सल; ग्राहक न्यायालयाने MakeMyTrip, OYO ला ठोठावला दंड

ग्राहकाला 42 हजार रूपये भरपाई देण्याचे आदेश
Goa Hotel Booking | Consumer Court
Goa Hotel Booking | Consumer Court Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Hotel Booking: गोव्यातील हॉटेलमध्ये केलेले बुकिंग कोणतेही ठोस कारण न देता रद्द केल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने MakeMyTrip, OYO रूम्स आणि गोव्यातील एका हॉटेलला दंड ठोठावला आहे.

चंदिगड जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग-I ने याबाबत निर्णय दिला आहे. त्यानुसार या संस्थांना संबंधित ग्राहकाला भरपाई म्हणून 42,000 रूपये द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. या ग्राहकाने आगाऊ पैसे भरूनही त्याचे हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले होते.

आयोगाचे अध्यक्ष पवनजीत सिंग आणि सदस्य सुरजीत कौर, सुरेश कुमार सरदाना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे आदेश दिले. त्यानुसार तक्रारदाराला 35000 रूपये नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून 7000 द्यावे, असे म्हटले आहे.

Goa Hotel Booking | Consumer Court
Vishwajit Rane: मोफत IVF उपचार करणारे गोवा ठरणार पहिले राज्य; 100 हून अधिक दाम्पत्यांनी केली नोंदणी

नफेखोरीसाठी कंपन्या असे वागल्या. त्या तक्रारदारासोबत चुकीच्या पद्धीतने वागल्या. त्यांच्या वर्तनाने तक्रारदाला, त्यांच्या कुटूंबाला त्रास झाला. कोणतेही ठोस कारण न देता ऐनवेळी हॉटेल बुकिंग रद्द केल्याने तक्रारदारास मनस्ताप झाला, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.

विनीत मारवाह असे या तक्रारदाराचे नाव आहे. त्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये GoIbibo द्वारे The Essence Retreat या हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. ही कंपनी MakeMyTrip ची उपकंपनी आहे. हे बुकिंग डिसेंबर 2021 मध्ये पत्नी आणि मुलीसोबत पाच दिवसांसाठी होते.

पण चेक इनच्या अवघ्या तीन दिवस आधी अचानक हॉटेलने “अन-ऑपरेशनल” असून खोली उपलब्ध नाही, असे सांगित बुकिंग रद्द केले आणि 10432 रूपये रक्कम विनित मारवाह यांना परत केली होती.

Goa Hotel Booking | Consumer Court
Kadamba New Buses: पणजी ते गोवा विद्यापीठ मार्गावर दिवाळीनंतर धावणार इलेक्ट्रिक बस

पण, मारवाह यांना हॉटेलच्या त्याच कॅटेगरीतील पाच रूम्स त्याच तारखांसाठी उपलब्ध असल्याचे दिसले. परंतु त्याचे दर 27207 रूपये होते. त्यामुळे मारवाह यांनी आयोगाकडे धाव घेतली.

MakeMyTrip ने न्यायालयात सांगितले की ते केवळ सेवा आणि ग्राहक यातील मध्यस्थ आहे, असे म्हटले होते तर ओयोने सांगितले की, त्यांची भूमिका केवळ बुकिंग करण्यापुरती मर्यादित आहे. उर्वरित दायित्व हॉटेल मालकाचे आहे.

प्रचंड गर्दीमुळे हॉटेलच्या रूम्सच्या दरात दररोज वाढ होत होती. त्याच खोलीसाठी जास्त किंमत देण्यास ग्राहक तयार होते. त्यामुळे नफेखोरीसाठी कंपन्यांनी असे केल्याचे मत आयोगाने मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com