Crime News: तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला! तिघे अटकेत, मुख्य संशयितासह दोघे फरार

Goa Surawali Youth Attack: पूर्ववैमनस्यातून सुरावली येथे रसूल शेख या तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Goa Surawali Youth Attack
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: पूर्ववैमनस्यातून सुरावली येथे रसूल शेख या तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. करण लमाणी राठोड (रा. बाणावली), अमन कुमार (रा. कोलवा; मूळ बिहार) आणि रॉबिन माथूर (रा. कुडतरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मुख्य संशयित शंकर (रा. बाणावली; मूळ कर्नाटक) याच्यासह आणखी एकटा फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसूल याचा भाऊ मलिक शेख यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काल १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रसूल हा सुरावली येथील बास्किन रॉबिन्स आइस्क्रीम पार्लरजवळून जात असताना संशयितांनी सुरावली येथे तरुणावर रॉडने जीवघेणा हल्ला त्याचा पाठलाग केला. जुन्या वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसूल याच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Goa Surawali Youth Attack
Goa New Taxi Rules: टॅक्सी व्यवसायाला मोठा धक्का! आता चालकासह कारही मिळणार भाड्याने; केंद्र सरकारचा नवा नियम

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली. करण राठोड याने दिलेल्या माहितीच्या आधारे हल्ल्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड आणि पांढऱ्या रंगाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत आयुष, उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुदास कदम आणि कोलवा पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

गुन्हेगारांची गय नाही : मुख्‍यमंत्री

मडगाव येथे राष्ट्रीय पत्रकारदिनाच्या कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी सुरावलीतील हल्ल्याबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले की, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हद्दपार केले जाईल.

Goa Surawali Youth Attack
Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.