ISL Football Tournament: हेर्रेरा हैदराबादविरुद्ध बेंचवर राहण्याचे संकेत

ISL Football Tournament: एफसी गोवाचा नवा खेळाडू: आयएसएल फुटबॉल स्पर्धेत उद्या सामना
ISL Football Tournament
ISL Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

ISL Football Tournament: एफसी गोवाचा नवा स्पॅनिश मध्यरक्षक बोर्हा हेर्रेरा याने संघासमवेत सराव सुरू केला आहे, मात्र हैदराबाद एफसीविरुद्ध गुरुवारी (ता. 1) होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत 31 वर्षीय खेळाडू बेंचवर राहण्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मंगळवारी दिले.

मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीतर्फे हेर्रेरा 2022-23 मोसमात खेळला. त्यावेळी हैदराबादने आयएसएल स्पर्धेच्या लीग फेरीत दुसरा क्रमांक पटकावला होता.

2023-24 मोसमात जानेवारीपर्यंत लास पाल्मास येथे जन्मलेला खेळाडू ईस्ट बंगालतर्फे खेळला. रविवारी (28) सुपर कप विजेत्या ईस्ट बंगालचे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो आता एफसी गोवा संघात दाखल झाला आहे.

ISL Football Tournament
Yuri Alemao: डिकाॅस्‍ता यांच्या विरुद्ध कारस्थान; विरोधकांनी मुद्दाम सभागृह नाकारले

मार्केझ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोर्हा हेर्रेरा याच्याविषयी सांगितले, की `दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या लढतीत तो कदाचित बेंचवर असेल, अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

एफसी गोवासमवेत त्याने खूपच कमी सराव केला आहे. तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.

कोणत्याची जागी खेळू शकतो, गोल नोंदवू शकतो आणि गोल करण्यात मदत (असिस्ट) करू शकतो. संघासाठी तो उपयुक्त खेळाडू असून सेट पिसेस व्यूहरचनेत तो तरबेज आहे.`

स्पेन, भारतात खेळताना चमक

मार्केझ ला-लिगा स्पर्धेत लास पाल्मास संघाचे मार्गदर्शक असताना हेर्रेराने या नावाजलेल्या स्पॅनिश लीगमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर स्पॅनिश द्वितीय लीगमध्ये तो रेयाल व्हायाडोलिडतर्फे खेळला. भारतात आतापर्यंत तो 49 सामने खेळला आहे. त्याने 6 गोल केले असून 12 असिस्टची नोंद केली आहे.

आयएसएलचा दुसरा टप्पा आव्हानात्मक: मार्केझ

कोणतीही फुटबॉल लीग असो, स्पर्धेचा दुसरा टप्पा नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण असतो, असे मत एफसी गोवा मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मंगळवारी व्यक्त केले.

हैदराबाद येथे गुरुवारी (ता. 1) त्यांचा हैदराबाद एफसीविरुद्ध दुसऱ्या टप्प्यातील सामना होईल. एफसी गोवा संघ सध्या स्पर्धेत अपराजित आहे.

10 सामन्यांत 7 विजय व 3 बरोबरी या कामगिरीसह 24 गुण नोंदविले आहेत. सध्या ते दुसऱ्या स्थानी असून अव्वल स्थानावरील केरळा ब्लास्टर्सच्या तुलनेत दोन गुण कमी आहेत.

`हैदराबाद एफसीचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ पगाराविना आहेत. तेथील लोकांची स्थिती खूपच अवघड आहे, वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. त्यांच्यासाठी मी दुःखी आहे. तरीही हैदराबादविरुद्धचा सामना आमच्यासाठी सोपा नसेल. त्यांचे नवोदित खेळाडू तुल्यबळ आहेत.`

-मानोलो मार्केझ, मुख्य प्रशिक्षक एफसी गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com