Goa Stray Cattle Issue: न्यायालयाने निर्देश देऊनही राज्यातील भटक्या गुरांची समस्या जैसे थे! वाहचालक त्रस्त

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र यामध्ये कोणताच बदल न झाल्याचे दिसून येते.
Goa Stray Cattle Issue
Goa Stray Cattle IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Stray Cattle Issue: राज्यातील भटक्या जनावरांचा मुद्दा नव्या वर्षातही जैसे थे आहे. भटकी गुरे रस्त्याच्या मध्ये ठाण मांडून बसतात. रस्त्यावर इतरत्र फिरत असतात यामुळे पादचाऱ्यांना आणि विशेषत: वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र यामध्ये कोणताच बदल न झाल्याचे दिसून येते.

Goa Stray Cattle Issue
Goa News Updates 23 January 2024: दिवसभरातील ठळक घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

माहितीनुसार, 2007 मध्ये न्यायालयातर्फे नगरपालिका, पंचायत अधिकारी आणि पोलिसांना भटक्या गुरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याला आता तब्बल 16 वर्षे उलटून गेली तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

भटक्या गुरांची समस्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक अपघातही घडले आहेत. तसेच ही गुरे वाहनचालकांवर हल्ला करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशा घटनांमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला.

आधी या समस्या फक्त ग्रामीण भागातच असायच्या मात्र आता शहरी भागातही भटक्या गुरांचा वावर वाढला असून यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ही समस्या उद्भवते कारण गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांची देखभाल करण्यासाठी लागणारा खर्च भागवणे शेतकऱ्यांना कठीण जाते. तसेच जनावरे विकण्यासही अडथळे येतात. त्यामुळे शेवटी ते त्यांना सोडून देतात. मग ही गुरे रस्त्यावर कुठेही भटकत कळपाने राहतात.

दरम्यान या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com