Goa Garbage Fee Deduction: ‘डेक बेड’, कचरा शुल्कात कपात; पर्यटन विकास महामंडळाचा नवा आदेश

पर्यटन वाढीला मिळणार चालना : व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Garbage Fee Deduction पणजी : राज्यातील पर्यटन व्यावसायिकांना नव्या हंगामाचे वेध लागले आहेत. त्यामुळे शॅक व्यावसायिकांची ‘डेक बेड’ व कचरा विल्हेवाट शुल्कात 40 ते 50 टक्के कपात करण्यासंबंधीचा नवा आदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाने जाहीर केला आहे. हा निर्णय पर्यटन वाढीला चालना देणारा ठरू शकतो. (Deck Bed Garbage Charges Deduction)

Goa
Non Veg Food in Goa : गोव्यात शाकाहारापेक्षा मांसाहार स्वस्त!

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने आंतरदेशीय पर्यटक मोठ्या प्रमाणात राज्यात येत आहेत. हे पर्यटन व्यवसायासाठी शुभ संकेत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. पर्यटन व्यवसायातील अडथळे दूर करण्याबरोबर व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जेटी धोरणाबरोबर जलक्रीडा धोरणाचाही मसुदा राज्य सरकारकडून नागरिकांसाठी सादर केला जाणार आहे.

यावर येणाऱ्या सूचना, हरकती स्वीकारून हे धोरण लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. याचाच भाग म्हणून किनारी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शॅक व्यावसायिकांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन विविध मागण्या सादर केल्या होत्या. ‘डेक बेड’ व कचरा विल्हेवाट शुल्कात 50 टक्के कपातीची मागणी केली होती. राज्य सरकारने ही कपात मान्य केली आहे.

शुल्क 25 वरून 15 हजारावर!

नव्या दरानुसार एका पर्यटन शॅकसाठी 20 ‘डेक बेड’ आणि तितक्याच छत्र्या यांच्यासाठी 25 हजार रुपये शुल्क भरावे लागत होते. आता ते 15 हजार रुपये करण्यात आले आहे, तर कचरा विल्हेवाटीसाठीचे शुल्क म्हणून प्रत्येक शॅकमालकाला 10 हजार रुपये वेगळे भरावे लागत होते. आता या शुल्कात 50 टक्के कपात केल्याने 5 हजार रुपये भरावे लागतील. याशिवाय हे शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता हे शुल्क 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरता येते.

Goa
Marigold In Sattari: सत्तरी तालुका ‘झेंडूमय’; दिवाळीत 1 टन फुलांची विक्री

शॅक शुल्क कायम

किनारपट्टी भागात तात्पुरत्या उभारण्यात येणाऱ्या शॅक व्यावसायिकांच्या असोसिएशनकडून कोरोना आणि कमी पर्यटकांचे कारण देत राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात 50 टक्के कपातीची मागणी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नसून ‘अ’ वर्गातील शॅकसाठी 1 लाख 37 हजार 500 रुपये आणि ‘ब’ वर्गातील शॅकसाठी 1 लाख 10 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ते आताही कायम आहे. सध्या राज्यातील 33 किनारपट्टीवर 331परवानगी देण्यात आली आहे.

कोविड काळात राज्य सरकारने अशाच प्रकारच्या सवलती शॅकमालकांना दिल्या होत्या. आताही दिल्या जात आहेत. यामुळे स्थानिक शॅकमालकांना त्याची मदत होणार आहे. प्रामुख्याने ‘डेक बेड’ परदेशी पर्यटकांकडून वापरले जातात. सध्या तरी परदेशी पर्यटकांची संख्या कमीच आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये या संख्येमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com