Ganesh Chaturthi 2023: 'पीओपी' ला म्हणा रामराम, यंदा फक्त पारंपरिक गणेशमूर्ती.

Ganesh Chaturthi 2023: गोव्यातील गणेशमूर्ती कलाकारांचे गोमंतकीयांना साकडे.
Ganesh Chaturthi
Ganesh ChaturthiDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला साजरी होणारी गणेश चतुर्थी गोव्यातील एक महत्वाचा सण मानला जातो. आपल्या धर्मशास्त्रानुसार साजरे होणारे सर्व सण हे निसर्गाशी जोडले गेलेले आहेत.

त्यातून पर्यावरण रक्षणाचा बोध दिला जातो. प्रत्येक चराचारात ईश्वर असल्याची शिकवण हे सण आम्हाला देत असतात.

जसजशी गणेश चतुर्थी जवळ येते तसे मूर्ती कलाकार गणेश मूर्तींवर रंगरांगोटीचा शेवटचा हात फिरवण्यात मग्न होतात. पारंपरिक पद्धतीने शाडू किंवा चिकण मातीपासून सुबक अशा मूर्ती तयार करून चतुर्थीपूर्वी बाजारात विक्रीस उपलब्ध करतात.

या परांपारिक व्यवसायात आता युवा पिढीनेदेखील उत्साहाने सहभाग घ्यायला सुरवात केली आहे. परंतु राज्यात आडमार्गाने येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरीस च्या मूर्ती पाहून त्यांचा उत्साह मावळायला लागला आहे. आशा मूर्त्यांवर बंदी असून देखील सर्रास पणे बाजारपेठेत विकल्या जातात हे दुर्दैव आहे.

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती जरी आकर्षक, उठावदार, सुंदर आणि वजनाने हलक्या असल्या तरी त्या निसर्गाला हानिकारक असल्याने सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे. असे असताना देखील काही विक्रेते आडमार्गाने या मूर्ती बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात.

Ganesh Chaturthi
इस्लामिक कार्यशाळेत शालेय मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडले, हिंदू परिषद म्हणते ते दाबोळीतील 'स्कूल जिहाद' प्रकरण काय?

अडीच - तीन महिने सतत मातीमध्ये रमून आणि चित्रशाळेत रात्री जागवून मूर्ती घडविणारे गणेश मूर्ती कलाकारही आज या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना आलेल्या मागण्या बघून चिंतेत पडले आहे. गेली कित्येक पिढ्यांनी चलविलेला हा व्यवसाय टिकवायचा तरी कसा हा प्रश्न त्यांचासमोर उभा आहे.

अनेक वर्षांपासून पणजोबा, आजोबा, वडील यांच्याकडून हातात आलेली हि कला जोपासणारे युवा कलाकार राज्याच्या व पर्यावरणाच्या हितासाठी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत.

राज्याबाहेरून येणाऱ्या या पिओपीच्या मूर्तींमुळे गोमंतकातील स्थानिक पारंपरिक कलाकारांच्या कलेची किंमत खालावत आहे. तर या मूर्ती आणून लोक थेट धंदा करीत आहेत. यात निसर्गदेवतेची पुजा हि संकल्पना भंग होत असल्याची भावना हे युवा कलाकार व्यक्त करीत आहेत.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2023: काणकोणात पाच हजार मूर्ती तयार, रंगरंगोटी अंतिम टप्पात

गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती कालाकारांसामोर चिकण मातीची मोठी समस्या उत्पन्न झाली आहे. आता पूर्वीसारकी चिकणमाती मिळणे मुश्किल. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पीओपी च्या मूर्तींचे आक्रमण बाजारात वाढले आहे ज्याचा फटका आम्हाला बसतो. त्यामुळे सरकारने पारंपरिक मूर्तीकलाकरांना चिकण माती उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी तसेच मूर्तीकला टिकवून ठेवण्यासाठी एखादी कार्यशाळा सुरू करावी

रमाकांत शेटकर ( गणेशमूर्ती कलाकार, डिचोली)

दरवर्षी आम्ही किमान २८० चिकण मातीच्या मूर्ती करतो परंतु त्या विकल्या जात नाहीत. आमची सरकार ला एकच विनंती आहे की ज्या विक्रेत्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती रस्त्यांवर विक्रीस ठेऊन धंदा मांडला आहे त्यावर तातडीने कारवाई करावी. आणि जे पारंपरिक पद्धतीने कार्यशाळेत गणेशमूर्ती करतात त्यांना प्रोत्साहन द्यावे.

प्रथमेष वेलिंगकर (गणेशमूर्ती कलाकार, साखळी)

चिकण मातीच्या मूर्ती करायला जास्ती वेळ लागतो पण त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा पर्यावरणपूरक आहे. निसर्गाचा नाश करणाऱ्या या मूर्तींना विरोध होणे काळाची गरज आहे. हस्तकला महामंडळाने या महागाईच्या काळात गणेशमूर्ती काळाकरांना गेल्यावर्षी अनुदान दिले नाही.

मनोज प्रभुगावकर (गणेशमूर्ती कलाकार, माशे)

आजोबा पणजोबा पासून आम्ही कार्यशाळेतूनच गणपती आणतो. कार्यशाळेत बनणाऱ्या मूर्ती या नेहमी पर्यावरणपूरक असतात ज्याचा निसर्गाला कधीच त्रास होता नाही. त्यामुळे आमच्या वाडीलधाऱ्या व्यक्तींनी संगीतल्याप्रमाणे कार्यशाळेतीलच गणेशमूर्ती आम्ही पूजातो. माझी नागरिकांना देखील हीच विनंती आहे की त्यांनी देखील कार्यशाळेतूनच मूर्ती आणावी.

करण उसपकर (साखळी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com