Ganesh Chaturthi 2023: काणकोणात पाच हजार मूर्ती तयार, रंगरंगोटी अंतिम टप्पात

अंतिम रंगरंगोटी : पन्नासहून अधिक गणेश चित्रशाळा कार्यरत
Dainik Gomantak
Dainik GomantakDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023 गणेश चतुर्थी अवघ्या दहा दिवसावर आल्याने गणेश मूर्तीकार रात्री जागवून गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवू लागले आहेत. त्यामुळे काणकोणात गणेश चित्र शाळा जागू लागल्या आहेत.

काणकोणात पोळे ते गुळे व खोला ते खोतीगावपर्यत पन्नास पेक्षा जास्त चित्र शाळा या गणेश चित्र शाळांतून दरवर्षी सरासरी पाच हजार लहान मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून त्यावर शेवटचा हात फिरवण्यात येत आहे.

त्याशिवाय काणकोणात अकरा सार्वजनिक गणेश मंडळे व एक पोलिस ठाण्याचा गणपती आहे. परिसरातील सर्वच गणेशमूर्ती स्थानिक कलाकारांकडून तयार केल्या जातात. काणकोणात अभावानेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे पूजन केले जाते.

Dainik Gomantak
Goa University: गोवा विद्यापीठ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात! प्राध्यापकाला गुंडाकडून धमकी...

दरवर्षी चिकणमाती, रंग त्याचप्रमाणे मजुरी यांच्यात वाढ झाल्याने मूर्तीचे दरही मूर्तीकारांना वाढवावे लागतात. सध्या काणकोणात चिकणमातीचा अभाव असल्याने सावंतवाडी व माजाळी या भागातून चिकणमाती आणावी लागत आहे.

काणकोणात कदंब बसस्थानकासमोर असलेल्या शेतात मुबलक प्रमाणात चिकण माती उपलब्ध होत होती, मात्र गेल्या दहा वर्षांत या शेतीच्या आजूबाजूला बांधकामे उभी राहिल्याने या मातीत खड्डे मिसळून ही माती मूर्ती घडविण्यासाठी कुचकामी ठरली आहे. या मातीने मूर्ती घडविल्या तर मूर्तीला भेगा पडत असल्याचा मूर्तीकारांचा अनुभव आहे.

Dainik Gomantak
Ganesh Chaturthi 2023: बाजारपेठ सजल्या, लगबग वाढली, म्हापसा बाजारात नवचैतन्याचे वातावरण

कागदापासून गणेशमूर्ती

  • कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करणारे काणकोण मधील एकमेव मूर्तीकार मनोज प्रभूगावकर आहेत. दरवर्षी किमान पाच गणेशणूर्ती ते कागदाच्या लगद्यापासून तयार करतात.

  • या पत्रीच्या गणेशाबरोबरच ते श्री गणेशाची कागदावरील प्रतिमा ते पूजतात. त्याचीच दुसरी आवृत्ती म्हणून काहीनी कागदी लगद्याच्या गणपतीची मूर्ती पूजण्यास आरंभ केला. त्याला माशे येथील मनोज प्रभूगावकर यांनी साथ दिली.

  • त्यांनी त्यामध्ये नाविन्य आणून कागदाचा बुका व त्यामध्ये गोंद घालून सुबक मूर्ती तयार केल्या. या वजनाने हलक्या असून पर्यावरण पूरक आहेत.

Dainik Gomantak
Goa Rape Case: बलात्कारप्रकरणी शिवप्पा लमाणीला जामीन नामंजूर

अनुदानाचा पत्ता नाही! :

कागदाच्या लगद्याच्या मूर्तीना जास्त वेळ लागतो, मात्र त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा पर्यावरणपूरक आहेत. सरकारने पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना विरोध करणे गरजेचे आहे.

हस्तकला महमंडळाने या महागाईच्या काळात गणेशमूर्ती कलाकारांना गेल्या वर्षीचे अनुदान दिले नाही, अशी कैफियत माशे येथील दरवर्षी 180 पेक्षा जास्त गणेशमूर्ती करणाऱ्या मनोज प्रभूगावकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com