Goa GST: मे महिन्यात गोव्याचे 587 कोटी जीएसटी संकलन! एप्रिलपेक्षा घट, गतवर्षीच्या तुलनेत वाढ; वाचा Report

May GST Collection: देशाचे मे २०२५ मध्ये जीएसटी संकलन २.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे वार्षिक तुलनेत १६.४ टक्क्यांनी वाढ दर्शविणारे आहे.
Goa GST revenue May
GST collection comparison GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मागील महिन्यात गोवा राज्याचे ५८७ कोटी रुपये जीएसटी संकलन राहिले आहे. मे महिन्याचा विचार केला तर गत एप्रिल महिन्यापेक्षा जीएसटी संकलनात घट, तर गतवर्षीच्या मे २०२४ च्या तुलनेत वाढ दिसून येत आहे.

देशाचे मे २०२५ मध्ये जीएसटी संकलन २.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे वार्षिक तुलनेत १६.४ टक्क्यांनी वाढ दर्शविणारे आहे. २७,२१० कोटी रुपयांच्या परतफेडीनंतर, निव्वळ महसूल १.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

केंद्रीय अर्थखात्याने जीएसटी संकलनाची राज्यवार यादी व संपूर्ण आकडेवारी जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्य जीएसटी संकलनात आघाडीवर राहिले आहे. मे महिन्यात या राज्याने ३१,५३० कोटींचा जीएसटी संकलन केले आहे. तर सर्वात कमी जीएसटी संकलन लक्षद्विपचे राहिले आहे, ते ७ कोटींचे आहे. मात्र लहान राज्यांचा विचार केला तर गोवा सर्वात जास्त जीएसटी संकलन करणारे राज्य राहिले आहे.

Goa GST revenue May
UPI Transactions: 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर द्यावा लागणार GST? सरकारने सांगितली सत्यता

सन २०२३ मध्ये मे महिन्यात गोवा राज्याचे जीएसटी संकलन ५२३ कोटी होते, २०२४ मध्ये मे महिन्याचे ५१९ कोटी संकलन राहिले, तर यावर्षी ५८७ कोटी संकलन राहिले आहे. गतवर्षी मे महिन्याच्या तुलनेत यावर्षी ६७ कोटी अधिक आहे. पण एप्रिल महिन्यात गोव्याचे जीएसटी संकलन ८०६ कोटी राहिले आहे. त्यामुळे २१९ कोटी रुपयांची तफावत दिसून आली आहे.

Goa GST revenue May
Mormugao House Tax: वाढीव घरपट्टी परत करा! मुरगाववासीय आक्रमक; 4 वर्षे उलटूनही रक्कम पालिकेकडून प्रलंबित

दर महिन्याला वाढ

गोव्यात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ७,१४६ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. ही १० टक्क्यांहून अधिक वाढ असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच गोव्यात दर महिन्याच्या जीएसटी संकलनात सरासरी २० टक्के वाढ होत आहे. त्यामुळे गोव्यातील विविध क्षेतातून समाधानकारण जीएसटी संकलन होत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १२.५१ टक्क्यांनी वाढ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com