Ganesh Chaturthi 2023 : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणारा गोव्यातील तरूण इंजिनियर

स्वतःच्या घरापासून सुरवात करीत गेली सहा वर्षे सलग पर्यावरणपूरक गणेशमूर्ती करून पर्यावरण रक्षणचा संदेश देणारा मांद्रे गावातील संकेत मांद्रेकर.
Sanket Mandrekar with his idol
Sanket Mandrekar with his idolDainik Gomantak

गेल्या काही काळात गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमुर्तींचा वापर वाढत चालला आहे. पर्यावरण रक्षणाच्या या जागरात तरूणाईचा वाटा अर्थातच नेहमीच मोठा राहिला आहे. गोव्यातील एका इंजिनियर तरूणाने देखील हा ध्यास जपत स्वतःच्या घरापासून सुरवात केली व आता आजूबाजूच्या अनेकांना पर्यावणरपूरक गणेशमूर्ती देण्यापर्यंत त्याचा प्रवास येऊन पोहचला आहे. 

दरवर्षी गणेश चतुर्थी आली की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुबक आणि सुंदर गणपतीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध होतात. त्यांचा खप देखील जास्त होतो. मात्र या मूर्ती व्यवस्थित विसर्जित न झाल्याने त्याचा परिणाम आपल्याला पर्यावरणावर पाहायला मिळतो. म्हणून प्रत्येकवर्षी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती पुजण्याचे आवाहन केले जाते.

Sanket Mandrekar with his idol
Gomantak Home Ganesh Decoration Competition: अखिल गोवा पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा

पण फक्त आवाहन करून न थांबता मांद्रे गावातील संकेत मांद्रेकर हा तरुण गेली सहा वर्षे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवतोय. आधी स्वतःच्या घरातून सुरवात करत आता आपल्या मित्रमंडळी आणि निकटवर्तीयांना पर्यावरण रक्षणचे धडे तो देत आहे.

पूर्णपणे चिकण माती आणि कसल्याही प्रकारचे रंग न वापरता फक्त कडधान्य, गवत, लाकडाचा भुसा अशाप्रकारचे साहित्य वापरुन पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तो तयार करतो. सुरवातीला स्वतःसाठी एकच गणेशमूर्ती तयार करण्यापासून लोकांच्या आग्रहास्तव यावर्षी त्याने जवळपास १५ मूर्ती त्यांनी बनविल्या.

Sanket Mandrekar with his idol
Ganesh Chaturthi: करंज्‍या, माेदक बनविण्‍याची तयारी अंतिम टप्‍प्‍यात; खरेदीसुद्धा जोमात

सुरवातीला चिकण माती व्यवस्थीत मळून त्याला साच्यात घालून त्या मातीला आकार दिला जातो. साच्यातून काढल्यावर ती मूर्ती सुकविण्यासाठी ठेवली जाते. त्यानंतर त्यावर विविध कडधान्यांचा वापर करून मूर्ती सजविली जाते व शेवटी हळद, शेंदूर, कुंकू, तांदूळ ह्यांचा उपयोग करून मूर्ती रंगविली जाते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा रासायनिक रंग वापरला जात नाही.   

संकेत मांद्रेकर ने सुरू केलेल्या या पर्यावरण रक्षणाच्या वेगळ्या प्रयत्नाना यश मिळत आहे. गोव्यातील काही नामवंत व्यक्तिंसोबतच राज्यातील इतर गणेशभक्तांकडून त्याला ऑर्डर्स आल्या. पण अशी गणेशमूर्ती घडवायला वेळ लागत असल्याने आपण कमीच ऑर्डर्स घेत असल्याचे त्याने सांगितले.

मेकॅनिकल इंजीनीयरिंग चा डिप्लोमा पुर्ण झाल्यावर संकेत ने आपली आवड असलेली हस्तकला, मूर्तीकला, चित्रकला जपत नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्याने इंडिया गॉट टेलंट सारख्या मोठ्या रीयालिटि शो मध्ये आपली कला सादर केली आहे.

गणेश विसर्जनानंतर होणारी गणेशमूर्तीची विटंबना पाहून मला ह्या पर्यावरणपूरक गणपती करण्याची कल्पना सुचली. आपला प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडला गेलेला आहे त्यामुळे त्याच रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या गणेशमूर्ती बनविण्यामागे एकाच हेतु की लोकांनी जागृत होऊन पूर्वजांची परंपरा टिकवावी. मोठे सार्वजनिक गणेशमूर्तीचा अपवाद वगळता निदान आपल्या घरातील गणपती तरी पर्यावरणपूरक असेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.

संकेत मांद्रेकर, गणेशमूर्ती कलाकार मांद्रे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com