Goa State Election Commission: शिरसई ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 77.43% मतदान; मतमोजणी सोमवारी

Goa State Election Commission: प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकूण 350 उमेदवार आहेत.
Goa State Election Commission
Goa State Election CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

Sirsaim Election: उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील शिरसई ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 5 च्या पोटनिवडणुकीसाठी आज 28 जानेवारी रोजी मतदान झाले.

ग्रामपंचायत निवडणूक बिगर पक्षीय पद्धतीने घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान सरकारी शाळेत आज रविवारी झालेल्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते.

Goa State Election Commission
Goa Tourism: वीकेंडसाठी पर्यटक दाखल; मात्र कळंगुट, बागा किनारी वाहतूकीचे तीन तेरा

प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकूण 350 उमेदवार असून त्यापैकी 171 पुरुष मतदार आणि 179 महिला मतदार आहेत. यापैकी 135 पुरुष तर 136 महिला मतदारांनी मतदान केल्याचे गोवा स्टेट इलेक्शन कमिशनने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

77. 43 % मतदान झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचे आयोगातर्फे कळवण्यात आले आहे.

सदर मतदानाची मतमोजणी 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून मामलतदार बार्देश तालुक्याच्या अधिसूचित मतमोजणी केंद्रात येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com