Goa Tourism: वीकेंडसाठी पर्यटक दाखल; मात्र कळंगुट, बागा किनारी वाहतूकीचे तीन तेरा

Goa Tourist Places: सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे गोव्यात पर्यटकांनी गर्दी केलीय.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Crowd of tourists in Goa during three consecutive days of holidays: 26 जानेवारीच्या सुट्टी दुसऱ्याच दिवशी आलेला शनिवार आणि त्याला जोडून आलेला रविवार या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांच्या काळात पर्यटनाची राजधानी समजल्या जाणाऱ्या गोव्यात पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र किनारी भागात दिसून आलंय.

नूतन वर्षारंभ साजरा करण्यासाठी पर्यटकांची गोव्याला सर्वाधिक पसंती असते. त्याचप्रमाणे सप्ताहाच्या अखेरीस म्हणजेच वीकेंड पर्यटनासाठीही देशी पर्यटक गोव्यात अधिक संख्येने येत आहेत.

Goa Tourism
Vagator Beach: वागातोरच्या ‘रोमियो लेन’वर पुन्हा प्रशासनाचा हातोडा; अवैध बांधकामवाल्यांचे धाबे दणाणले

या वर्षातील हा पहिलाच मोठ्या सुट्यांचा वीकेंड आहे. ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गोव्यानंतर पुद्दुचेरी, जयपूर, उटी या स्थळांना देशी पर्यटकांची पसंती आहे.

अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत गोव्यात हॉटेल, लॉजिंगचे दर स्थिर असून हवामानही आल्हाददायक आहे.

इतर किनारी भागांच्या तुलनेत कळंगुट, कांदोळी तसेच बागा परिसरात येणाºया पर्यटकांची संख्या जास्त आहे. आलेले बहुतेक पर्यटक हे स्वतः ची वाहने घेऊन आले आहेत. त्यामुळे वाहनांची कोंडी होण्यास कारण ठरले आहे.

नाताळ तसेच नवीन वर्षानंतर किनारी भागातील पर्यटकांची संख्या घटली होती. त्यातून किनारी भागातील पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झालेला.

आता तीन दिवस का होईना पर्यटक वाढल्याने व्यावसायिक मात्र आनंदित झाले आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास सर्वत्र वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com