मडगाव, म्हापसा, मुरगावसह 11 नगरपालिकांच्या प्रभागांची हद्द निश्चित, निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी; सीमांकनानंतर जागांचे आरक्षण होणार स्पष्ट

goa municipal elections ward delimitation 2026: गोवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ११ नगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागांची नव्याने सीमांकन अधिसूचना जारी केली आहे.
goa municipal elections ward delimitation 2026
goa municipal elections ward delimitation 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ११ नगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागांची नव्याने सीमांकन अधिसूचना जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाद्वारे यापूर्वी ९ सप्टेंबरला जारी केलेली प्रभाग सीमांकनाची अधिसूचना रद्द केली होती. त्यानंतर आयोगाने नव्याने अधिसूचना काढून प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे नेली आहे.

या नव्या अधिसूचनेत मुरगाव, मडगाव (Margao), म्हापसा, कुडचडे-काकोडा, डिचोली, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, वाळपई, पेडणे आणि सांगे या ११ नगरपालिकांचा समावेश आहे. या अधिसूचनेमुळे संबंधित पालिकांच्या निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग सीमांकनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

goa municipal elections ward delimitation 2026
Goa Government: ‘बॉस’ बनलेल्‍या शिपायांना तत्‍काळ वठणीवर आणा! सरकारी खात्यांमधील 'बॉसगिरी'वर मुख्यमंत्री सावंत आक्रमक; खातेप्रमुखांना दिला कडक इशारा

नव्या अधिसूचनेत प्रत्येक प्रभागाची हद्द निश्चित करताना संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांचे भाग, स्थानिक परिसर आणि घर क्रमांक यांचा तपशील देण्यात आला अकरा पालिकांच्या प्रभागांची नव्याने अधिसूचना आहे. त्यामुळे कोणता परिसर कोणत्या प्रभागात समाविष्ट होणार, हे निश्चित करण्यासाठी या तपशिलाला महत्त्व आहे. संबंधित पालिकांमधील मतदारांना तसेच निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या सीमांकनाचा थेट परिणाम जाणवणार आहे.

goa municipal elections ward delimitation 2026
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर जाळ्याचा ‘फिक्सर’ गजाआड! गोव्यातील दाम्पत्याला 2.6 कोटींचा गंडा; मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी

उच्च न्यायालयाने यापूर्वीची अधिसूचना रद्द करताना प्रभाग सीमांकनाच्या प्रक्रियेत राज्य सरकारशी कायद्यानुसार सल्लामसलत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. सीमांकनासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे अहवाल, नकाशे आणि हरकतींवर घेतलेल्या निर्णयांचा तपशील सरकारसमोर ठेवून त्याची मते विचारात घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या प्रक्रियेत ७७ हरकतींचा समावेश होता.

goa municipal elections ward delimitation 2026
Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

न्यायालयाने २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम प्रभाग सीमांकन अधिसूचना प्रसिद्ध करण्याची मुदत निश्चित केली होती. त्यामुळे आयोगाने नव्याने अधिसूचना जारी केल्याने पालिका निवडणुकांच्या पुढील प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, प्रभाग सीमांकनानंतर जागांचे आरक्षण निश्चित करणे आणि त्यानंतर निवडणुकीची अधिसूचना जारी करणे अशा पुढील टप्प्यांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com