Goa Startup: गोवा सरकारची स्टार्टअप योजना थंडावली? 2024 मध्ये केवळ 22 नव्या स्टार्टअपची नोंदणी

Goa startup registration 2024: गोवा सरकारच्या स्टार्टअप प्रोत्साहन योजनेंतर्गत नोंदणीकृत २६२ स्टार्टअप्सच्या तपशीलावरून राज्यात स्टार्टअप क्षेत्राची गती वर्षानुवर्षे कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Startups in Goa
Goa startupDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा सरकारच्या स्टार्टअप प्रोत्साहन योजनेंतर्गत नोंदणीकृत २६२ स्टार्टअप्सच्या तपशीलावरून राज्यात स्टार्टअप क्षेत्राची गती वर्षानुवर्षे कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. या स्टार्टअप्सची नोंदणी पाहता, २०२४ मध्ये नव्याने नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या केवळ २२ होती. स्टार्टअप योजना सुरू झाल्यापासून मागील वर्षांच्या तुलनेत ही लक्षणीय घट आहे.

राज्यातील स्टार्टअप्स (Startup) योजना २०२१ पासून सुरू झाली. यावर्षी एकूण ३३ स्टार्टअप्सची नोंदणी झाली होती. यानंतर २०२२ मध्ये ही संख्या वाढून ३७ वर पोहोचली; मात्र २०२३ मध्ये या संख्येत घट होऊन २९ स्टार्टअप्सची नोंद झाली आणि २०२४ मध्ये ही संख्या आणखी कमी होऊन केवळ २२ स्टार्टअप्सची नोंदणी झाल्याची माहिती विभागाने दिली.

Startups in Goa
Startup in Goa: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोव्यातील सरकारी महाविद्यालयांत स्टार्टअप विभाग होणार सुरू

गोवा (Goa) हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी आयटी, टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, फिनटेक यासारख्या क्षेत्रातही राज्याला संधी असून सरकार त्यादृष्टीने पावले देखील उचलली जातात. मात्र नव्या उद्योजकांनी पुढे येण्यासाठी जे सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आवश्यक आहे, ते देण्याचे आश्वासन सरकारने दिले असले तरी त्याचा अभाव नोंदणीच्या संख्येवरून दिसून येतो.

Startups in Goa
Startups in Goa: गोमंतकीय महिलांची भरारी! 270 स्टार्टअपचे सांभाळतात नेतृत्व; दहा हजार रोजगार निर्मितीचा मनोदय

उद्योजकांशी संपर्क साधला असता त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, धोरणात्मक अडचणी आणि योग्य मार्केट अॅक्सेसचा अभाव ही काही मुख्य कारणे नोंदणी कमी होण्यामागे असू शकतात. त्यामुळे राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठीची धोरणे पुन्हा एकदा परखडपणे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com