ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणाची अधिसूचना काही दिवसांतच! दिल्लीत सकारात्मक चर्चा; शिष्‍टमंडळ भेटले शहांना

Goa ST political reservation: ‘एसटी’ समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘एसटी’ नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
ST Reservation
ST ReservationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘एसटी’ समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘एसटी’ नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्‍मक चर्चा झाल्‍याचे समजते. लवकरच चार मतदारसंघ आरक्षित करण्यासंदर्भात अधिसूचना काढली जाण्याची शक्यता आहे.

या शिष्टमंडळात मुख्यमंत्री सावंत यांच्यासह आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर, माजी मंत्री गोविंद गावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांचा समावेश होता.

ST Reservation
Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

अमित शहा यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. आदिवासी नेत्यांनी तसेच श्रीपाद नाईक यांनी येत्‍या विधानसभेच्या निवडणुकीत आदिवासी समाजाला आरक्षण देण्याची गरज ठामपणे मांडली. यासंदर्भात कायदा मंजूर होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने समाजात नाराजी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने ‘एसटी’ आरक्षणाबाबत अधिसूचना तातडीने जारी करावी, अशी मागणी करण्यात आली.

चार मतदारसंघ होणार आरक्षित?

सूत्रांच्या माहितीनुसार, या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सांगे, केपे, प्रियोळ आणि नुवे हे चार मतदारसंघ एसटी समाजासाठी आरक्षित होण्याची शक्यता असून, त्‍यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ST Reservation
Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. आता अधिसूचना प्रक्रियेला वेग मिळेल. आगामी निवडणुकीपूर्वीच आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे.

- गोविंद गावडे, आमदार

आरक्षण मिळाले नाही तर दुसरा पर्याय

अनुसूचित जमाती समाज बांधवांची एक तातडीची सभा रविवारी नेत्रावळी-सांगे येथे घेण्यात आली. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आरक्षण मिळाले नाही तर समाजासाठी पर्याय उभा करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. विविध राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय एसटी बांधवांनी यावेळी एकजूट दाखविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com