Goa SSC Result : गुळेली विद्यालयाचा 100 टक्के निकाल

कोवीड काळ असल्यामुळे प्रत्यक्ष शिकवणी नसतांना सुद्धा विद्यार्थ्यांनी (Students) बरीच मेहनत घेत हे यश संपादन केल्याबद्दल मुख्याध्यापक सूरज नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
मिताली शाबलो गावकर गुळेली विद्यालयात प्रथम
मिताली शाबलो गावकर गुळेली विद्यालयात प्रथमDainik Gomantak
Published on
Updated on

गुळेली : सरकारी माध्यमिक विद्यालय (Government Secondary School) गुळेली सत्तरीचा शालांत निकाल (Result) 100 टक्के लागला आहे. कु. मिताली शाबलो गावकर हिने 84.5 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे , तर विद्यालयात व्दितीय स्थानी तेजस कृष्णा नाईक 82.5 % आला आहे. शीतील रमाकांत सांगोडकर 81 % गुण मिळवत विद्यालयात तृतीय स्थान पटकावले . चार विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत तर 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले .

मिताली शाबलो गावकर गुळेली विद्यालयात प्रथम
Goa: तीन दिवसांच्या अधिवेशनातही सरकारचे वाभाडे काढू : विजय सरदेसाई

कोवीड काळ असल्यामुळे प्रत्यक्ष शिकवणी नसतांना सुद्धा विद्यार्थ्यांनी बरीच मेहनत घेत हे यश संपादन केल्याबद्दल मुख्याध्यापक सूरज नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुलांनी वर्षभर नेटवर्कसाठी बरीच मेहनत घेतली गुगल मीटवरवर हजेरी लावत चांगल्या प्रकारे गुण संपादन केल्याबद्दल पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उत्तम मेळेकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

मिताली शाबलो गावकर गुळेली विद्यालयात प्रथम
Goa vaccination : वास्कोत मोफत लसीकरण

शाळा ऑनलाइन असून सुद्धा मुलानी विविध ऑनलाइन स्पर्धात भाग घेवून आपले कर्तृत्व सिद्ध केले तसेच दहावीत सुद्धा नेत्रदिपक असे यश संपादले शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेत विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतल्या बद्दल पालक शिक्षक संघाच्यावतीने उपाध्यक्ष विंदा विठू नाईक यांनी मुख्याद्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com