Goa: तीन दिवसांच्या अधिवेशनातही सरकारचे वाभाडे काढू : विजय सरदेसाई

विरोधकांना सामोरे जाण्यासाठी सरकार घाबरत असल्यामुळे कोविडच्या (Corona) नावाखाली 10 दिवसांचे अधिवेशन 3 दिवसांचे करण्याचा निर्णय जरी घेण्यात आला आहे.
 विजय सरदेसाई
विजय सरदेसाईDainik Gomatak
Published on
Updated on

मडगाव : विरोधकांना सामोरे जाण्यासाठी सरकार घाबरत असल्यामुळे कोविडच्या (Covid -19) नावाखाली 10 दिवसांचे अधिवेशन 3 दिवसांचे करण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी या तीन दिवसात आम्ही सरकारचे (Government) वाभाडे काढूच असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Forward party) विधिमंडळ प्रमुख विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी म्हटले आहे.

 विजय सरदेसाई
Goa Politics : महिला कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणणार
 विजय सरदेसाई
Goa : प्रतिष्ठेच्या गुलाब पुरस्काराचे मानकरी जाहीर

वास्तविक हे अधिवेशन 10 दिवसांचे असणे आवश्यक होते. या पूर्वी 24 मार्च ते 16 एप्रिल असे 13 दिवसांचे जे अधिवेशन बोलाविले होते. ते तीन दिवसात आटोपते घेतल्यानंतर त्यावेळी उरलेले 10 दिवसांचे अधिवेशन 17 जुलै पासून घेतले जाणार असे सांगितले होते. मात्र त्यानंतर सरकारने केवळ सोपस्कार पूर्ण करण्याच्या इराद्याने ते आता तीन दिवसांवर आणले आहे. असे करताना सत्ताधारी पक्षाने कुठलाही निर्णय घेताना निदान विरोधकांचे म्हणणे तरी ऐकून घेतले पाहिजे हे लोकशाहीचे संकेत आहेत तेही गुंडाळून ठेवले असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com