Goa SSC Exam 2025: Best Wishes! चांगला पेपर लिहा; गोव्यात शनिवारपासून दहावीची परीक्षा; 32 केंद्र, 18,871 विद्यार्थी

SSC Board Exam Goa: गोव्यात उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून (शनिवार) दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. राज्यातील 32 केंद्रे यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
Goa SSC Exam 2025
Goa SSC Exam CentersDainik Gomantak
Published on
Updated on

Goa SSC Exam 2025 Begins From March 1 Exam Centers And Student Details

पणजी: गोव्यात उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून (शनिवार) दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. राज्यातील 32 केंद्रे यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या 32 केंद्रांवर तब्बल 18871 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

परीक्षेचा कालावधी काय?

दरम्यान, दहावीची ही परीक्षा 1 मार्चपासून सुरु होऊन 21 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. उद्या (शनिवार) पहिली भाषा (इंग्रजी/मराठी/उर्दू) विषयाचा पेपर होणार आहे. दररोज सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत पेपर असणार आहे.

Goa SSC Exam 2025
CBSE SSC Exam: सीबीएसई वर्षातून दोनवेळा घेणार दहावीची बोर्ड परीक्षा; विद्यार्थ्यांचा ताण वाढणार का कमी होणार?

यंदा विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचा आकडा अधिक

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचा आकडा जास्त आहे. 9297 विद्यार्थी तर 9574 विद्यार्थींनी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर म्हणजेच 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. गेल्या वर्षी 18914 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. गत वर्षापेक्षा यंदा विद्यार्थ्यांचा आकडा हा कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Goa SSC Exam 2025
Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

परीक्षेची तयारी

विद्यार्थ्यांबरोबर (Student) राज्य शिक्षण मंडळानेही तयारी केली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. कडक बंदोबस्तात ही परीक्षा पार पडणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com