CM Pramod Sawant: स्पेशल ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या गोव्याच्या खेळाडुंना सरकारी नोकरीसह 5 लाख रूपये रोख बक्षीस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; रौप्यपदक विजेत्यांना 3 लाख तर कांस्यपदक विजेत्यांना 1 लाख रुपये बक्षीस
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिकमध्ये गोव्याच्या खेळाडुंनी एकूण 19 पदकांची कमाई केली होती. या सर्व खेळाडुंचा आज, बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दरम्यान, यावेळी या खेळाडुंसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली. त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंना पाच लाख रूपये रोख आणि सरकारी नोकरी अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे.

CM Pramod Sawant
Kadamba Bus Accident: कदंबा बसला अपघात; ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, भरधाव बस चढली रेलिंगवर

या स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्यांना रोख 5 लाख रूपये रोख, रौप्य पदक जिंकलेल्या विजेत्यांना प्रत्येकी 3 लाख रूपये रोख तर कास्य पदक जिंकलेल्यांना 1 लाख रूपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

बर्लिनमधील स्पर्धेत भारतीय संघात 13 गोमंतकीयांचा समावेश होता. भारतीयांनी या स्पर्धेत पन्नास पदकांचा टप्पा ओलांडला आहे. या स्पर्धेत गोमंतकीय क्रीडापटूंनी नऊ सुवर्ण, पाच रौप्य व पाच ब्राँझ अशी एकूण १९ पदके जिंकून सुवर्णपदकांत दोन दशकांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.

CM Pramod Sawant
Kadamba Bus Accident: कदंबा बसला अपघात; ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, भरधाव बस चढली रेलिंगवर

पदकविजेते गोमंतकीय

सुवर्णपदके (9) ः गीतांजली नागवेकर (800मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंगमध्ये 2), मॅन्फिल फेर्राव (बास्केटबॉल), वीणा नाईक (व्हॉलिबॉल), व्हेन्सन पेस, अमन नदाफ, फ्रान्सिस पारिसापोगू व ज्योएल रॉड्रिग्ज (सर्व फुटबॉल).

रौप्यपदके (5) ः गीतांजली नागवेकर (400 मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), आयुष गडेकर (व्हॉलिबॉल), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), अस्लम गंजानावार (ज्युदो).

ब्राँझपदके (5) ः सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), गेबान मुल्ला (भालाफेक), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), गायत्री फातर्पेकर व काजल जाधव (दोघी महिला फुटबॉल).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com